Sindhudurg: वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबदरस्त मंडळातर्फे ‘गरुडझेप महोत्सव २०२३‘चे आयोजन

0
62
जबदरस्त मंडळातर्फे ‘गरुडझेप महोत्सव २०२३‘चे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने १३ ते १५ जानेवारी या कालावधीत राऊळवाडा येथील पेट्रोलपंपानजिक ‘गरुडझेप महोत्सव २०२३‘चे आयोजन केले आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच आरोग्य आणि रक्तदानासारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुतार-शिल्पकार-समाज-मंड/

शुक्रवार दि.१३ रोजी सकाळी ९ वाजता अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या विद्यमाने आरोग्य शिबिर, सायंकाळी ७ वाजता ६०० किलो वजनी गटासाठी जिल्हास्तरीय खुली रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व चषक तसेच बेस्ट फ्रंटमॅन व बेस्ट लास्टमॅन यांना अनुक्रमे ५०० व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ४०० रुपये असून संघांनी स्वप्नील पालकर (८४८२८३५३९३) किवा केतन वेंगुर्लेकर (९६०४२६२७३३) यांच्याकडे ११ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करावी. प्रथम येणा-या १६ संघांनाच प्राधान्य दिले जाईल.

शनिवार दि. १४ रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर, सायंकाळी ७ वाजता गुंडू सावंत आणि संदिप लोके यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना, रविवार दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता प्राथमिक व  माध्यमिक शाळांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली आहे. पहिली ते दुसरीसाठी रंगभरण स्पर्धा असून प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५५५, ३३३, २२२, प्रमाणपत्र व चषक देण्यात येतील. तिसरी ते चौथीसाठी चित्रकला स्पर्धा असून प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ७७७, ५५५, ३३३ प्रमाणपत्र व चषक देण्यात येतील. पाचवी ते सातवी तसेच आठवी ते दहावीच्या मुलांसाठी  चित्रकला स्पर्धा असून प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ११११, ७७७, ५५५ प्रमाणपत्र व चषक देण्यात येतील. पहिली ते दुसरी व तिसरी ते चौथी यांनी चित्र रंगविण्यासाठी तेलखडू तर पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीच्या मुलांनी वॉटर कलरचा वापर करावा.

सायंकाळी ७ वाजता विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, त्यानंतर ८ वाजता कै. सुधीर कलिगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘अजिक्यतारा २‘ हा ट्रीकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.

तिन दिवस चालणा-या या महोत्सवादरम्यान विक्रेत्यांना आपापले स्टॉल लावण्यासाठी गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी स्वप्नील पालकर (८४८२८३५३९३) किवा मंगेश परब (८१४९६१७२०९) यांच्याशी संफ साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here