sindhudurg: वेंगुर्ला राऊळवाडा येथील ‘जबरदस्त’ च्या उपक्रमांसाठी नेहमी सहकार्य राहील- मनिष दळवी

1
226
वेंगुर्ला राऊळवाडा येथील 'जबरदस्त' च्या उपक्रमांसाठी नेहमी सहकार्य राहील- मनिष दळवी

वेंगुर्ला प्रतिनिधी- जबरदस्त मंडळाने भविष्यात असेच सेवाभावी, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रम साततत्याने राबवावेत, त्यासाठी आपण सहकार्य करीन असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी बक्षिस वितरण प्रसंगी केले.  https://sindhudurgsamachar.in/भारतातील-नैसर्गिक-तंतूंस/

 वेंगुर्ला राऊळवाडा येथील जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने गरुडझेप महोत्सव २०२३ अंतर्गत आयोजित केलेला चित्रकला, रंगभरण, रस्सीखेच स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ १५ जानेवारी रोजी संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेनचे तालुका प्रमुख यशवंत परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, ज्ञानेश्वर केळजी, शिवसेनेचे शहर प्रमुख अजित राऊळ, वायंगणी सरपंच सुमन कामत, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, देवस्थानचे मानकरी रविद्र परब, उभादांडा उपसरपंच टिना आल्मेडा, भाऊ मालवणकर, विरेंद्र कामत-आडारकर, वृंदा गवंडळकर, कार्मीस आल्मेडा, संजय गावडे, प्रा.संजय पाटील, नामदेव सरमळकर, पिंटू कुडपकर, आनंद रेडकर, विलास कुबल आदी उपस्थित होते.

 रंगभरण स्पर्धेतील विजेते-पहिली ते दुसरी गट-प्रथम- रुजल योगेश सातोसे (कुडाळ), द्वितीय- आराध्या मंदार राऊळ (वेंगुर्ला), तृतीय- सानवी मनीष सातार्डेकर (वेंगुर्ला), चित्रकला स्पर्धा- तिसरी ते चौथी गट-प्रथम- मनस्वी भूपेंद्र खानोलकर (वेंगुर्ला नं.१),  द्वितीय- हर्षांक रमेश टेमकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), तृतीय- कौस्तुभ समीर परब (वेंगुर्ला नं.१), पाचवी ते सातवी गट- प्रथम- प्रिया प्रदीप देसाई (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी), द्वितीय- सर्वेश विकास मेस्त्री (वेंगुर्ला नं.३), तृतीय-चिन्मय जगदीश किनळेकर (वेंगुर्ला नं.४), आठवी ते दहावी गट प्रथम- दीक्षा राजन पालकर (अणसुर-पाल हायस्कूल), द्वितीय- विष्णू उदय आरोलकर (दाभोली इंग्लिश स्कूल), तृतीय विभागून – मोहन रामचंद्र मालवणकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन) व गुंजन रघुनाथ कुडपकर (एम.आर.देसाई स्कूल), रस्सीखेच स्पर्धेतील विजेता संघ क्षेत्रपालेश्वर होडावडा तर उपविजेता संघ- सिद्धेश्वर डाळकर, बेस्ट फ्रंट मेन- दिपक पार्सेकर (क्षेत्रपालेश्वर होडावडा संघ) बेस्ट लास्ट मेन- दादा परब (सिद्धेश्वर डाळकर अ संघ) आदींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

र विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले मान्यवर राष्ट्रीय कबड्डा स्पर्धेचे पंच म्हणून निवड झालेले जयेश राजन परब, राष्ट्रीय नेमबाज म्हणून निवड झालेली कु.सानिया सुरेश आंगचेकर, कर्णबधीर असूनही उत्कृष्ट चित्रकार असलेली पूजा रुपाची धुरी, कै. बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार सुरेश कौलगेकर, आरवली सोन्सुरे येथील प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार चंद्रकांत मेस्त्री तसेच रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ राऊळवाडाचे अध्यक्ष संभाजी राऊळ, तसेच मंडळाचे कार्यकर्ते मंगेश परब, सिद्धेश रेडकर, विजय आंदुर्लेकर, अनंत रेडकर, कौशल मुळीक, स्वाती पाटकर, प्रांजल वेंगुर्लेकर, सागर शिरसाट, बबन आंदुर्लेकर शिवाजी राऊळ, चिंटू राऊळ, संजय भाटकर, यशवंत किनळेकर, शेफाली खांबकर, मनाली रेडकर, ज्ञानेश्वर रेडकर, विवेक राऊळ, नाथा बोवलेकर, निल नांदोडकर यांनी परीश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते काका सावंत यांनी केले तर आभार अजित राऊळ यांनी मानले.

फोटोओळी – जबरदस्तच्या महोत्सवांतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण करण्यात आला.

1 COMMENT

  1. […] मुंबई- मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रधानमंत्री या कार्यक्रमात वीस नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण करणार आहेत. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-राऊळवाडा-ये… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here