Sindhudurg: वेंगुर्ला लोक अदालतीमध्ये ७८ प्रकरणे निकाली

0
18
लोक अदालतीमध्ये ७८ प्रकरणे निकाली

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील एकूण ७८ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तर कौटुंबिक हिसाचार कायदा कलम १२खाली दाखल एका प्रकरणात अर्जदार व जाबदार यचेमध्ये यशस्वीरित्या तडजोड होऊन ती एकत्र नांदण्यास गेली.https://sindhudurgsamachar.in/kokan-जागा-बघायला-आली-नि-कॉटेजव/

तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथील दिवाणी न्यायालयात ११ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ल्याच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील व पॅनेल प्रमुख तथा दिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांच्या हस्ते झाले.

 या अदालतीमध्ये दिवाणीकडील ८फौजदारी ११ प्रकरणे व ग्रामपंचायत पाणीपट्टीघरपट्टी व विविध बँका यांच्याकडील एकूण ४९ वादपूर्व प्रकरणे तडजोडील मिटविण्यात आली. यावेळी दिवाणीफौजदारी व वादपूर्व प्रकरणातील २० लाख २१ हजार ७७८ एवढी रक्कम वसुली करण्यात आली. पॅनेल सदस्य म्हणून अॅड.पुनम नाईक यांनी काम पाहिले. तर यावेळी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक एस.एस.कांबळेएस.एच.खेडेकरवकील वर्गपक्षकार व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

फोटोओळी – वेंगुर्ला येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे मिटविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here