Sindhudurg: वेंगुर्ला व कुडाळ येथे २५ व २६ रोजी संगीताचा कार्यक्रम

1
175
वेंगुर्ला व कुडाळ येथे २५ व २६ रोजी संगीताचा कार्यक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी- गोव्यातील स्वस्तिक संस्थेच्या संजीवन संगीत अकादमीतर्फे २५ व २६ फेब्रुवारीला वेंगुर्ला व कुडाळ येथे शास्त्रीय व सुगम संगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला राहणार आहे. शनिवार दि. २५ फेब्रुवारीला वेंगुर्ला येथे मधुसुदन कालेलकर सभागृहात संध्याकाळी ६ वाजता तर रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी श्री देव कुडाळेश्वर मंदिरात संध्याकाळी ६ वाजता हा संगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रेडी-येथील-मातोश्री-पार/

लोकप्रिय पार्श्वगायक पंडित सुरेश वाडकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पणजी येथील संजीवन संगीत अकादमीत शास्त्रीय गायनसारंगी वादनसंवादिनी वादन व तबला वादनाचे शिक्षण गेली ५ वर्षे दिले जात आहे. या अकादमीतून बरेच कलाकार तयार होत असून स्वतंत्र गायन व वादनाचे कार्यक्रम करत आहेत. या अकादमीत सारंगी या दुर्मिळ वाद्याचे खास वर्ग सुरू केले आहेतज्यासाठी ग्वाल्हेर येथून पूर्ण वेळ सारंगी शिक्षक नेमलेले आहेत. गोमंतकीय सुप्रसिद्ध गायक डॉ. प्रविण गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अकादमीची यशस्वी वाटचाल चालू आहे.

या कार्यक्रमात डॉ. प्रविण गांवकर यांचे शास्त्रीय गायनसारंगी वादक वसीम खान यांचे सारंगी वादन व पल्लवी पाटीलउर्वी फडकेआरती गावडे व डॉ. प्रविण गांवकर यांचे भक्तीगीत व भावगीत सादरीकरण होणार आहे. त्यांना तबल्यावर उत्पल सायनेकरसंवादिनीवर मालू गांवकरपखावजवर मनीष तांबोसकर व टाळ वाद्यावर कृष्णा परब साथ करणार आहेत. दोन्ही कार्यक्रमाचे निवेदन अनुक्रमे मानसी वाळवे व नेहा उपाध्ये करणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे अभिजात संगीत व संजीवन संगीत अकादमीच्या कार्याचा पसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

फोटोः डॉ.प्रविण गावकरवसीम खानउर्वी फडकेआरती गावडेपल्लवी पाटील

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here