वेंगुर्ला प्रतिनिधी- खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान येथे वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सिधुदुर्ग जिल्ह्यातील हे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या आईंचा व पत्नींचा सत्कार समारंभ शुक्रवार दि. ३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित केला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शेतकऱ्यांची-वीज-तोडणी-ब
सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त दि. ३ व ४ मार्च रोजी विविध धार्मिक आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त दि.३ मार्च रोजी नित्यपूजा, ९ वा. आवळीवृक्षाचे पूजन, दुपारी १२.३० वाजता गोवा येथील उद्योजक महेश नायक, उल्हास सावंत व प्रदिप घाडी आमोणकर यांच्या हस्ते सत्कार समारंभ, दुपारी १.३० वा. आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायं. ५ वा. स्थानिकांची भजने, सायं. ६.३० वा.धुपारती पालखी प्रदक्षिणा, सायं. ७ वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ‘तु सुखी रहा‘ हा काल्पनिक नाट्यप्रयोग, दि. ४ मार्च रोजी सकाळी नित्यपूजा, १० वा. श्रीसत्यनारायण महापूजा, आरती, पालखी, सायं. ५ वा. स्थानिकांची भजने, सायं. ७ वा. ओमकार दशावतार नाट्यमंडळ म्हापण यांचा ‘अग्नितांडव‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक दादा पंडित यांनी केले आहे.
याच कार्यक्रमावेळी श्री विठ्ठल मंदिर व श्री दत्तमंदिर यांच्या नुतनीकरणाचा शुभारंभही करण्यात येणार आहे.


