वेंगुर्ला प्रतिनिधी – आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे दशावतारी कला वृद्धिगत होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हा नाट्य महोत्सव असल्याचे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
श्री देवी सातेरी कला-क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित व बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत वेंगुर्ला सातेरी मंदिर येथे २१ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या भव्य दशावतारी नाट्य महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी नितीन मांजरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर पक्षाचे जिल्हा संघटक सुनिल डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनिल मोरजकर, शहरप्रमुख उमेश येरम, उपशहरप्रमुख आर.एम.परब, महिला शहर संघटक अॅड.श्रद्धा बाविस्कर-परब, वॉर्ड प्रमुख राजू परब, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, सातेरी कला-क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सुनिल परब, रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष दाजी परब, सचिव रविद्र परब, सातेरी देवस्थानचे मानकरी पपू परब, रामदास परब, अरविद परब, प्रसाद परब, सुधाकर परब, वासुदेव परब, मंगेश परब, उमेश परब, स्वप्निल परब आदी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मत्स्य-व्यवसायाला-चालन/
या महोत्सवाचे औचित्य साधून पार्सेकर दशावतार मंडळाचे मालक प्रभाकर पार्सेकर यांचा उमेश येरम यांच्या हस्ते तर महापुरुष दशावतार मंडळाच मालक भाई शिर्के यांचा मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उमेश येरम यांनी, स्वागत सुनिल परब यांनी तर सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले.
या नाट्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचा ‘शिव भांडारेश्वर‘ तर दुस-या दिवशी आजगांवकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘देव झाला गुराखी‘ हे नाट्यप्रयोग संपन्न झाले. दि.२३ रोजी सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ कसई-दोडामार्ग यांचा ‘बालहत्या‘, दि. २४ रोजी अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा ‘पहिला वारकरी‘, दि.२५ रोजी नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर-दोडामार्ग यांचा ‘पाप गेले पुण्यापाशी‘, दि. २६ रोजी वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा ‘स्त्रीवेशधारी गणेश‘, दि. २७ रोजी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे यांचा ‘अकल्पासूर वध‘ आदी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहेत. तरी नाट्यरसिकांनी यावेळी उपस्थित राहून या नाट्यमहोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटोओळी – श्री देवी सातेरी कला-क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित व बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत भव्य दशावतारी नाट्य महोत्सवाचे उद्घाटन नितीन मांजरेकर यांच्या हस्ते झाले.

