Sindhudurg: वेंगुर्ल्यातील महाआरोग्य शिबिराचा १५४ रुग्णांनी घेतला लाभ

0
34

वेंगुर्ला प्रतिनिधी- माझा वेंगुर्ला व किरात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उषःकाल अभिनव मल्टी-सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, सांगली या अद्ययावत हॉस्पिटलच्या सहकार्याने कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा १५४ जणांनी लाभ घेतला.शिबिराचे उद्घाटन उषःकाल अभिनव मल्टी-सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, सांगलीचे मेडिकल सुप्रिटेंड संजय कोंग्रेकर व माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी उषःकाल अभिनव मल्टी-सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, सांगलीचे स्त्री रोगतज्ञ डॉ. कोंग्रेकर, जनरल सर्जन डॉ. आदिश फाटक, स्त्री रोगतज्ञ डॉ. श्वेता नरदे, अस्थि रोगतज्ञ डॉ. बिभीषण सारंगकर, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. मथुरा थोरात यांचा समावेश होता. तसेच सांगली रुग्णालयातील इको टेक्निशियन ओंकार माने, स्टाफ नर्स जयश्री सुर्यवंशी, मिसेस मगदूम, मिसेस मनिषा, सुनिता जाधव, सचिन घाडगे, प्रकाश कोळी आदींचा स्टाफ सेवा देण्यास कार्यरत होता.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-ज्येष्ठ-नागरिक-संघ-वेंग/

या कार्यक्रमास खास उपस्थित मान्यवरांत माझा वेंगुर्ला संस्थेचे अध्यक्ष निलेश चेंदणकर, राजन गावडे, मोहन होडावडेकर, संजय पुनाळेकर, गणेश अंधारी, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, कपिल पोकळे, सूर्यकांत प्रभू-खानोलकर, प्रितेश राऊळ, वसंत तांडेल, शेखर काणेकर, श्रीनिवास सौदागर, सुनील डुबळे, साईप्रसाद नाईक, पप्पू परब, प्रणव वायंगणकर, रविंद्र शिरसाट, संदिप परब, महेश वेंगुर्लेकर, नंदन वेंगुर्लेकर, जयराम वायंगणकर, महादेव मेस्त्री, डॉ. पूजा कर्पे, अँड. सुषमा प्रभू-खानोलकर, साक्षी पेडणेकर, शितल आंगचेकर, श्रेया मयेकर आदींचा समावेश होता. या महाआरोग्य शिबिराचा १५४ रुग्णांनी सायंकाळी उशिरापर्यंत लाभ घेतला.

फोटोओळी – वेंगुर्ला येथील महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उषःकाल अभिनव मल्टी-सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलसांगलीचे मेडिकल सुप्रिटेंड संजय कोंग्रेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here