Sindhudurg: वेंगुर्ल्यात गुरुवारपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजकरण

2
203
वेंगुर्ल्यात गुरुवारपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजकरण

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ल शहरांमध्ये नगरपरिषदे मार्फत  १५ डिसेंबर पासून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अँटी रेबिज लसिकरण मोहिम राबविण्यात येणार आहे,अशी माहिती वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ऊर्जा-संवर्धन-सप्ताहाच/

 वेंगुर्ला शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे. भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्याबाबत शहरातील नागरिकांकडून येणाया तक्रारींचा विचार करून वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अँटी रेबिज लसीकरण मोहीम १५ डिसेंबर पासून राबविण्यात येणार आहे. निर्मिती पिपल्स अँड ऍनिमल वेलफेअर सोसायटी नागपूर या संस्थेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अँटी रेबीज लसिकरण करण्यात येणार आहेत. या अंतर्गत शहरातील विविध वार्डामधून भटके कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपले खाजगी कुत्रे रस्त्यावर न सोडता आपल्या आवारामध्ये राहतील याची दक्षता घ्यावीअसे आवाहन वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

2 COMMENTS

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- पहिली मास्टर्स योगासन चॅम्पियनशिप ऑनलाईन राज्यस्तरीय योगासन स्पर्धा १० व ११ डिसेंबर रोजी झुम अॅपवर सिनिअर अ, ब व क अशा गटात घेण्यात आली. सिनिअर ब गटात वेंगुर्ला येथील किरण दिनकर ताम्हणकर हे राज्यातील पहिल्या दहामध्ये येऊन त्यांनी आठवा क्रमांक पटकाविला. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यात-गुरुवारप/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here