वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने आज शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. मातोश्री कला क्रिडा मंडळ-दाभोली नाका, तालुका शिवसेना कार्यालय-सुंदरभाटले, कॅम्प कॉर्नर, तांबळेश्वर-भगवती मित्रमंडळ गाडीअड्डा, मठ शिवाजी चौक आणि दाभोली-रेवणकरवाडी येथे नवदुर्गेचे पूजन करण्यात आले.
या नऊ दिवसात सातेरी (वेंगुर्ला), सातेरी (वेतोरे), सातेरी (मातोंड), सातेरी (दाभोली), सातेरी (खानोली), सातेरी (मठ), केपादेवी (उभादांडा), भराडी (परबवाडा), रवळनाथ, पूर्वस (वेंगुर्ला), गुणादेवी (कॅम्प), तांबळेश्वर-भगवती (गाडीअड्डा), भगवती (राजवाडा) या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव होणार आहे. यानिमित्त भजन, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही आयोजन केले आहे. वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात रोज नऊ दिवस देवीची विविध रुपात पूजा बांधली जाणार असून सोमवारी पहिल्या दिवशी देवीची सिहासनारुढ स्वरुपात पूजा बांधली होती.
फोटोओळी – वेंगुर्ला सातेरी मंदिरात देवीची सिहासनारुढ अशी पूजा बांधण्यात आली.


