वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरात आज धुळवडीच्या पार्श्वभूमीवर युवकांसह लहान मुलांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. दुपारनंतर ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात विविध रंगांची उधळण पहायला मिळत होती.
वेंगुर्ल्याच्या शिमगोत्सवाची सांगता धुळवडीने पाडव्याच्या आदल्या दिवशी होते. आज धुळवडी दिवशी दुपारनंतर ठिकठिकाणी लहान मुले व युवक यांनी रस्त्यावर एकत्र येत एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा आनंद लुटला. सायंकाळपर्यंत हा रंगपंचमीचा कार्यक्रम सुरु होता.
फोटोओळी – पिराचा दर्गा मित्रमंडळाने एकत्र येत एकमेकांना रंग लावत धुळवडीचा आनंद लुटला.