वेंगुर्ला प्रतिनिधी-तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन लोक अदालतीचे आयोजन केले आहे. लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित केली आहे. त्यातून त्यांना कमीत कमी वेळांत, कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी आदी प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनी, दुरसंचार निगम, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत यांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करुन वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यांत यावी यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले मिटवावेत. त्याकरिता संबधितांनी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला (दुरध्वनी क्रमांक ०२३६६-२६२७०७) येथे संफ साधावा.
ज्या पक्षकरांचे न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किवा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायतकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत असे आवाहन वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष के.के.पाटील व सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी केले आहे.



[…] दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर असलेल्या अक्षया चितळे यांनी वेंगुर्ला तालुका कार्यालयात भेट दिली. त्यावेळी भाजपा सिंधुदुर्गच्यावतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत रत्नागिरी सांस्कृतिक आघाडीच्या मुग्धा भट-सामंत उपस्थित होत्या. सांस्कृतिक आघाडी सिंधुदुर्गचे संयोजक बाळ पुराणीक, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके यांनी सिंधुदुर्गातील सांस्कृतिक वाटचालीची माहिती दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला असलेली दशावतार, व ही कला जीवंत ठेवलेली दशावतार मंडळे यांना राज्य सरकारकडून भरीव मदत मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली . तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे एक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी भाजपा सांस्कृतीक आघाडीने पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यात-१२-नोव्ह… […]