Sindhudurg: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस येथे ३३ जणांचे रक्तदान

2
197
Tuls Raktdan shibir

वेंगुर्ला प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वैच्छीक सेवा आणि सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ३३ जणांनी रक्तदान केले. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे हे सलग २०वे रक्तदान शिबिर होते.    https://sindhudurgsamachar.in/maharashtra-हे-राज्य-कुठल्या-दिशेला/                 

 श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच शंकर घारेउपसरपंच सचिन नाईकग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकरसदस्या चरित्रा परबरतन कबरेअपर्णा गावडेसिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष लिस्टर ब्रिटोश्रीकृष्ण कोंडूस्करराजेश पेडणेकरपत्रकार संजय पिळणकरमहेश राऊळसुजाता पडवळप्रतिष्ठान अध्यक्ष विवेक तिरोडकरउपाध्यक्ष प्रदिप परुळकरवैद्यकीय अधिकारी डॉ. अमित आळवेलाईफ ओके पलतडचे बाबली शेटकरमहेश अरोसकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर रक्तदान शिबिरासाठी सिंधु रक्तमित्र पतिष्ठान शाखा वेंगुर्ला आणि लाईफ ओके पलतड यांचे सहयोगी संस्था म्हणून सहकार्य लाभले.

शिबिरच्या यशस्वी नियोजनासाठी माधव तुळसकर,  मंगेश सावंतसद्गुरु सावंतराजू परुळकरप्रांजल सावंतवैष्णवी परुळकरअक्षता गावडेहेमलता राऊळरोहन राऊळसदाशिव सावंतसागर सावंतकृष्णा सावंतनिखिल ढोलेओंकार राऊळप्रसाद भणगे यांनी मेहनत घेतली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणा-या सर्व रक्तदात्यांचे प्रतिष्ठानच्या वतीने चंदनाचे रोप देऊन आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळकर तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.

फोटोओळी – रक्तदान शिबिरातील सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यता आले.

2 COMMENTS

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- समस्त वेंगुर्ला तालुका वारकरी मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत रात्रौ ७ ते ९ या वेळेत रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे भव्य वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेताळ-प्रतिष्ठान-सिंधु/ […]

  2. […] डॉ. वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केले. तेथे त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेताळ-प्रतिष्ठान-सिंध… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here