Sindhudurg: वेशभूषा स्पर्धेमध्ये अत्रेया नंदकिशोर आचार्य ,प्रांजल रुपेश नार्वेकर व मुग्धा वामन गावडे प्रथम.

1
151
वेशभूषा स्पर्धेमध्ये अत्रेया नंदकिशोर आचार्य ,प्रांजल रुपेश नार्वेकर व मुग्धा वामन गावडे प्रथम.
वेशभूषा स्पर्धेमध्ये अत्रेया नंदकिशोर आचार्य ,प्रांजल रुपेश नार्वेकर व मुग्धा वामन गावडे प्रथम.

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ले- चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिंदू धर्माभिमानी मंडळी, वेंगुर्ले यांनी वेंगुर्ले शहरांमध्ये नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले होते .या स्वागत यात्रेमध्ये शेकडो हिंदू धर्माभिमानी मंडळी सहभागी झाली होती. या स्वागत यात्रेनिमित्त तीन गटांमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. या वेशभूषा स्पर्धेमध्ये बालवाडी ते पहिली या गटातून कुमारी अत्रेया नंदकिशोर आचार्य, दुसरी ते चौथी या गटातून कुमारी प्रांजल रुपेश नार्वेकर, व पाचवी ते दहावी या गटातून कुमारी मुग्धा वामन गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या वेशभूषा स्पर्धांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला . तिन्ही गटांमध्ये एकूण ९८ स्पर्धक सहभागी झाले होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-न्यू-हॉलंड-अॅग्रिकल्चर/

बालवाडी ते पहिली या गटामध्ये द्वितीय क्रमांक कुमारी उर्मी अक्षय परब ,तृतीय क्रमांक कुमारी आराध्या मंदार राऊळ व उत्तेजनार्थ प्रथम कुमार हेरंब जयराम राऊळ व उत्तेजनार्थ द्वितीय कुमार रघुवीर अमृत काणेकर यांनी यश प्राप्त केले. 

तर दुसरी ते चौथी या गटामध्ये कुमार देवेश भगवान नवार याने द्वितीय क्रमांक, कुमारी शुभ्रा सदाशिव अंधारी तृतीय, कुमारी सानवी सहदेव परब उत्तेजनार्थ प्रथम व कुमारी दिव्या दिलीप मालवणकर हिने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळवला .

पाचवी ते दहावी या गटामध्ये द्वितीय क्रमांक कुमारी वरदा संदीप परब, तृतीय क्रमांक  कु.जयेश रमेश सोनुर्लेकर ,उत्तेजनार्थ प्रथम कुमार निरज विश्वास पवार व उत्तेजनांर्थ द्वितीय कुमारी आर्या हर्षानंद जुवलेकर यांनी यश प्राप्त केले.

स्पर्धेचे परीक्षण बालवाडीतील पहिली या गटासाठी श्री संजय पाटील प्रा. श्री सचिन परुळकर व श्री. बागलकर सर यांनी केले तर दुसरी ते चौथी या गटासाठी श्री रमेश नार्वेकर, श्री महेश बोवलेकर व  श्री खवणेकर सर यांनी परिक्षण केले, तर पाचवी ते दहावी या गटासाठी अॅड.श्रीमती सुषमा खानोलकर, श्रीमती स्मिता मांजरेकर, श्रीमती मृण्मयी केरकर व श्रीमती रत्नप्रभा साळगावकर यांनी परीक्षण केले.

या स्पर्धेसाठी बालवाडी ते पहिली या गटासाठी श्री विनय गरगटे ,यश बँगल्स वेंगुर्ले बाजारपेठ, यांनी तर दुसरी ते चौथी व पाचवी ते दहावी या गटासाठी श्री मिलिंद पिंजानी,महेंद्र वस्त्र भांडार, वेंगुर्ले बाजारपेठ यांनी रोख बक्षिसे पुरस्कृत केली होती. ही स्वागत यात्रा व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संयोजन समितीचे नियोजन प्रमुख श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,अॅड.सौ.सुषमा खानोलकर, रामेश्वर देवस्थानचे ट्रस्टी श्री रवी परब व श्री यशवंत उर्फ दाजी परब, तसेच श्री संजय पाटील ,श्री अजित राऊळ सर, श्री अरुण गोगटे यांनी प्रयत्न केले.

फोटोओळी – वेशभूषा स्पर्धेतील विजेते स्पर्धक

1 COMMENT

  1. […]  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले कॅम्प येथे आज श्री स्वामी समर्थ मंदिरात, श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्ती पूर्ण वातावरणात साजरा झाला. श्री स्वामी समर्थांचे शिष्य आनंदनाथ स्वामी यांना आत्मपादुका दिल्या त्या स्थानात श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन भाविकांच्या उपस्थितीत भक्ती पूर्ण वातावरणात साजरा झाला. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेशभूषा-स्पर्धेमध्ये-… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here