वेंगुर्ला प्रतिनिधी- राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांचा ८२ वा वाढदिवस वेंगुर्ला शहर राष्ट्रवादीतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमांत शाळेतील मुलांच्या शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेले खडू आणि स्केच पेन यांचा वापर करून शिक्षण देता येणारे नविन टेक्नीकचे ग्रीन व व्हाईट दोन बोर्ड राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका मुग्धा कनयाळकर यांच्याकडे प्रदान केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-निबंध-स्पर्धेत-कुडाळचे/
यावेळी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, जिल्हा सदस्य नितीन कुबल, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, शहर सचिव स्वप्निल रावळ, महिला शहर अध्यक्षा सुप्रिया परब, सुभाष तांडेल, शाळेच्या शिक्षिका नेहा गांवकर, साची वेंगुर्लेकर, सुप्रिया बेहेरे, धनश्री हुले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांत नम्रता कुबल व प्रज्ञा परब यांनी शरद पवार यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले.
फोटोओळी – राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत नविन टेक्नीकचे ग्रीन व व्हाईट दोन बोर्ड नम्रता कुबल यांनी मुग्धा कनयाळकर यांच्याकडे प्रदान केले.
[…] […]