Sindhudurg: शालेय बाल महोत्सवाचे उद्घाटन; खिलाडीवृत्तीने विद्यार्थी शाळेचे नाव उज्वल करतील- मोहन भोई

1
225

शालेय बालकलाक्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन

वेंगुर्ला प्रतिनिधी- शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव ही शासनाची संकल्पना स्तुत्य असून मुलांचा बौद्धिक विकास वाढण्यास मदत होणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मुले यात खिलाडूवृत्तीने कामगिरी करुन जिल्हास्तरावर आपल्या शाळेचे नाव नेतील असा आशावाद वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-गायरान-जमीन-वाटप-प्रकरण/

जिल्हापरिषद सिधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला तर्फे दोन दिवशीय तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन आज २९ डिसेंबर रोजी भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्या हस्ते झाले. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, शिक्षक समितीचे अध्यक्ष नितीन कदम, प्रमोद गावडे, महादेव आव्हाड, प्रियदर्शनी कावळे, सिताराम लांबर, शिक्षक पतपेढीचे संचालक त्रिबक आजगांवकर, अखिल भारतीय शिक्षक संघाचे अध्यक्ष एकनाथ जानकर, जुनी पेन्शन समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर वजराटकर, पदवीधर समितीचे अध्यक्ष झिलू घाडी उपस्थित होते. 

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. कोरोना काळात मुलांचा सर्वांगिण विकास खुंटला होता. दरम्यान, अशाप्रकारच्या उपक्रमामुळे मुलांचा सर्वांगिण विकास होऊन पुन्हा उत्तुंग भरारी घेणार असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी, सूत्रसंचालन लवू चव्हाण व ऋतिका राऊळ तर शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे यांनी आभार मानले.

फोटोओळी – शालेय बालकलाक्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी श्रीफळ वाढवून केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here