वेंगुर्ला प्रतिनिधी:
शिरोडा येथे काही दिवसापूर्वी व्यापाऱ्यांच्या दुकानांना आग लागून मोठी वित्तहानी झाली होती या व्यापाऱ्यांना व दवाखान्यास सर्वतोपरी मदत देण्याबरोबरच सदर इमारती यांची पुन: उभारणी मदत करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व त्यांच्या मित्र परिवारपुढे सरसावला असून त्यांनी या व्यापाऱ्यांना सर्वतोपरी मदत दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-राजन-तेली-टीका-करून-भाजप/
शिरोडा येथे व्यापाऱ्यांच्या दुकानांना आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती कोरोनामुळे अनेक व्यापाऱ्याना आर्थिक फटका बसलेला होता यातच अचानक नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याने या व्यापाऱ्यांना मदतीचा हात व सर्वतोपरी मदत देण्या साठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या व्यापारी यांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दीपक केसरकर मित्रपरिवार यांनी या व्यापाऱ्यांना मदतीचा हात दिला आहे आज शिरोडा येथे वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी घटनास्थळी भेट देत व्यापाऱ्यांशी संवाद साधला यावेळी व्यापारी डॉ प्रसाद साळगावकर, सुशील नाटेकर अजित आरावदेकर ,साईश नाटेकर विशाल गावडे ,सुमित चव्हाण जिल्हा संघटक सचिन वालावलकर तालुकाप्रमुख नितीन माजरेकवर शहराध्यक्ष उमेश येरम आदि उपस्थित होते
फोटो ओळी
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्र परिवारातर्फे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर व्यापाऱ्यांशी संवाद साधताना