Sindhudurg: शाश्वत सेवा बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षपदी मिताली मातोंडकर यांची निवड

0
37
शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी मिताली मातोंडकर
शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी मिताली मातोंडकर

वेंगुर्ला प्रतिनिधी- शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिधुदुर्ग या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी हौशी रंगभूमीवरील अभिनेत्री मिताली मातोंडकर यांची निवड करण्यात आली. नुकतेच या संस्थेला सहाय्यक धर्मादाय आयुक्त सिधुदुर्ग यांच्याकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

संस्थेच्या कार्याध्यक्षपदी मूळ मातोंड गावचे रहिवासी व सध्या यवतमाळ जिल्ह्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय मातोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सुकळवाड येथील संजय पाताडे, सचिवपदी पत्रकार महेंद्र मातोंडकर, खजिनदारपदी चौकुळ येथील राजकुमार चव्हाण, सहसचिवपदी सायली मातोंडकर, सहखजिनदारपदी कुडाळ येथील डॉ.सिद्धी चव्हाण तर सदस्य म्हणून संजना पाताडे व राजश्री चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-रेशामंडी-द्वारे-स्प्रि/

आरोग्यशिक्षणसाहित्य व सामाजिक क्षेत्रात कायमस्वरुपी सेवा उपलब्ध करुन देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार करणेअभिनयनृत्यसंगीत प्रशिक्षण वर्ग सुरु करणेतसेच व्यवसायाभिमुख उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेतर्फे वर्षभर राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून लवकरच संस्थेचा शुभारंभ करण्यात येईलअशी माहिती संस्थापक महेंद्र मातोंडकर (९१५८८८१६१८) यांनी दिली.

फोटो – मिताली मातोंडकरसंजय मातोंडकरसंजय पाताडेराजकुमार चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here