प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
मुबंई- धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच दिलाय.
धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांचे प्रयत्न सुरू आहेत. माञ कायदेशीर पेचप्रसंगात धनुष्यबाण चिन्ह गोठवू शकते असे तज्ञ सांगतात. त्यामुळे यापुढे शिंदे गट आपले चिन्हं तलवार किंवा ढाल-तलवार ठेवेल असे संकेत मिळत आहेत.
शिंदे गटाने निशाणीची पर्यायी व्यवस्था केली ?
शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत एकत्र सत्तेत येत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का दिला तो म्हणजे थेट पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा ठोकला. पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गट लढाई लढत आहे. त्यामुळे चिन्हाची लढाई कोण जिंकणार ? हे पाहणं महत्वाचं ठरेल. माञ शिंदे गटाने पर्यायी व्यवस्था केल्याची माहिती मिळत आहे. त्यानूसार शिंदे गट तलवार ठेवू शकते असे राजकीय अभ्यासक सांगतात.


