Sindhudurg: शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

0
33
विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

विद्यार्थ्यांसमवेत आ. वैभव नाईक किट घालून क्रीडा महोत्सवात झाले सहभागी;सुमारे ५०० विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग

प्रतिनिधी: पांडुशेठ साठम

कुडाळ- विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन कॉलेजचे अध्यक्ष तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार वैभव नाईक देखील विद्यार्थ्यांसमवेत किट घालून क्रीडा महोत्सवात सहभागी झाले. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जागी स्वागत विद्यार्थ्यांनी केले.व्हॉलीबॉल स्पर्धेचे त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून उदघाटन झाले. व्हॉलीबॉलची सर्व्हिस त्यांनी करत २ पॉईंट मिळविले. त्यानंतर मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करून त्यांनी क्रिकेट खेळण्याचाहि आनंद घेतला. स्वतः आमदार सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला होता.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-येथे-मदर-तेरे/

सलग ८ दिवस हा क्रीडा महोत्सव राबविला जाणार असून यामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, बॅटमिंटन,बुद्धिबळ, कॅरम, रनींग या स्पर्धा होणार आहे. कॉलेज मधील सुमारे ५०० विद्यार्थी वेगवेगळ्या क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. राजेश जगताप, प्रा.मेघा बाणे, सौ. आदिती सावंत यांसह इतर प्राध्यापक,व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालक राहुल परब यांनी केले.

        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here