परप्रांतीय मद्यपींनी मांडला उच्छाद; भाविकांना सहन करावा लागतोय त्रास, मंदिराचे पावित्र्यही धोक्यात !
प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर
वेंगुर्ला गोवा बनवटीच्या दारूची शिरोड्यातील देवूळवाडी माऊली पंचायतन मंदीर परिसरात राजरोस विक्री होत अाहे या परिसरात मद्यपी दारू डोसून धींगाणा घालीत असल्याने तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत शिवाय मंदिरात येणाऱ्या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच देऊळ परिसरात दारूच्या बाटल्यां टाकून दिल्या जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. असे असतानाही स्वच्छता अभियानाचा दिंडोरा पिटणारी ग्रामपंचायत मात्र मुग गिळून गप्प का आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शिरोडा हे गाव गोवा हद्दीला लागून असल्याने पुर्वी पासूनच येथे गोवा बनावटीची दारूची तस्करी होते हे सर्वज्ञात आहे. कारण लाचखाऊ वृत्तीमुळे यावर संबंधीत प्रशासन अंकुश ठेवू शकत नाही आणि यामुळे येथील युवा पीढी झटपट पैसा मिळवून श्रीमंती मिळवण्यासाठी तेथील पोलीस ठाणी संबंधीत बीट आॅफीसर यांच्याशी हितसंबंध जपून या व्यवसायात गुंतले आहेत. खाकीवर्दीलाही खिसाभरून पैसा मिळत असल्याने आलेल्या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष केले जाते असल्याच्या तक्रारी तेथील नागरीकांच्या आहेत.
असाच काहीसा प्रकार शिरोड्यातील माऊली मंदिराच्या मागिल देवूळ वाडीत शिरोडकर नामक मालकीच्या घरात वर्मा नामक इसम कसलीही भयभिती न बाळगता अनधीकृत्त गोवा बनावटीची बनावट दारूची विक्री करीत असून हा अनधीकृत मद्य विक्रीचा व्यावसाय शंभर ते दोनशे मीटर शाळा काॅलेजच्या परीसरात येत असल्याने काॅलेज तरूणाना सहज उपलब्ध होत आहे. त्याच प्रमाणे मद्यपी मद्यप्राशन करण्यासाठी तेथील गल्लीबोळांचा वापर करून तिथेच मुत्र विर्सजन करीत असल्याने दुर्गंधी तसेच रिकाम्या बाटल्यांचा खच पडत आहे.
काही मद्यपी मद्यप्राशन करून शिवीगाळ, मारामारी करीत असल्याने तेथील महिला वर्गात भयाचे वातावरण परीसरात पसरले आहे. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी तेथील पोलिस ठाण्यात तक्रारी देऊनही पोलीस दाद देत नसल्याने ओरस मुख्यालय येथील अधिक्षकांना निनावीपत्र पाठवून या प्रकारापासून परीसर मुक्त करण्याची विनंती करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने या संर्दभात तेथील नागरीकांनी आता मिडीयाकडे हा प्रकार उघड केला आहे.
या संदर्भात तेथील नागरिकांनी सहन करावा लागणारा त्रास व मंदिराच पावित्र्याला धोका पोचवणाऱ्या इसमास समज देवून सदर दारूअडा बंद करावा अथवा अन्य ठिकाणी त्याने तो व्यवसाय करावा असे नागरिकांचे गाऱ्हाणे संबंधीत प्रशासनाला कळवून जागे करण्याची विंनंती केली आहे. भर बाजार पेठेतील माऊली पंचायतन मंदीर शिरोडा ग्रामपंचायत हद्दीत चाललेला अवैध्य गोवा बनावटीचा दारू विक्रीचा गुत्ता तेथील पोलिस अधिकारी तसेच उत्पादन शुल्क अधिकारी यांनी त्वरीत कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देतील अशी आशा त्यांना वाटते


