Sindhudurg: श्री.राजाराम सखाराम(पांडुरंग) परब यांचे दुःखद निधन

0
162

ठाणे- श्री.राजाराम सखाराम(पांडुरंग) परब, मौजे मडुरे ता. सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. वय ८६ वर्षे, यांचे दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या डोंबिवली, ठाणे निवासस्थानी दुःखद निधन झाले. 

त्यांचा जन्म दिनांक १४ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. ते त्यावेळची मेट्रीक पास होते. १९५७ पासून पश्चिम रेल्वेत सेवेस रुजू झाले. रेल्वेतही विनाअपघात सेवा दिल्यामुळे त्यांना स्पेशल ए ग्रेड सर्टिफिकेट देण्यात आले होते. त्याशिवाय रेल्वेने त्यांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित केले होते. पश्चिम रेल्वेत रुजू होताना एक फायरमन म्हणून रुजू होण्यापासून त्यांच्या सुरु झालेल्या प्रवासाला त्यांनी एक स्टीम इंजिन ते ईलेक्ट्रीक एसीडीसी ईंजन पायलट म्हणून आपल्या कष्टाने प्रगतीचा आलेख उंचावत नेला आणि ते ईलेक्ट्रीक एसीडीसी ईंजन पायलट म्हणून सेवानिवृत्त झाले. रेल्वेची सेवा त्यांनी सचोटीने, अथक अविरत परिश्रमाने आणि प्रामाणिकपणे करत १९९३ रोजी ते पश्चिम रेल्वेतून सेवानिवृत्त झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे व एक मुलगी, नातवंडे, व पतवंडे आहेत. त्यांचे द्वितीय पुत्र श्री. गजानन परब हे मडुरे पंचक्रोशीतील थोर समाजसेवक ,माजी शिवसेना शाखाप्रमुख आणि माजी तालुका भ्रष्टाचार निर्मूलन अशासकीय समिती सदस्य, मराठा महासंघाचे माजी तालुका संघटक म्हणून परिचित आहेत. त्यांचे एक रिक्षा व्यवसायिक ते सिस्टीम इंजिनिअर म्हणून प्रगती आलेख, कर्तृत्व खडतर आहे. सध्या ते अमूल दूध मध्ये कार्यरत आहेत. मराठी व मालवणी कविता व कथा लेखक म्हणून सोशल मीडियावर परिचित आहेत. वडिलांचे आजारपण नजरेसमोर ठेवून त्यांना सुचलेली एक कविता, ज्यातून आत्माराम कसा बंधमुक्त होतो त्याचे विश्लेषण त्यांनी आपल्या कवितेतून मांडले आहे. किंबहुना जीवनाचे, आत्म्याचे सत्य मांडले आहे. कै. श्री.राजाराम परब यांच्या मृतात्म्यास शांती नी मुक्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

सत्याचा_प्रवास

शेवटचा मोकळा दि..र्..र्…घ श्वास… नी संपवूनी जातो अवघाची त्रास।। पाश होती सारे कैसे, बंधन मुक्त. जाणूनी चित्ती, आत्माराम त्रुप्त।। नाही चिंता-भय, नाही कसलेही चिंतन… तत्व मार्गस्थ होऊनी, अनंतात विलिन।। नात्या-गोत्याची मोहमाया त्यागतो… आत्माराम तो मग, एकला रे चालतो।। समर्पित होतो जीव, शिव-अनंतास… प्रारंभी उदय मग, सत्याचा प्रवास।। कोणाची ओढ मग, नारायण भेटीस… कोणी विसावतो, शिव गुजगोष्टीस

श्री. गजानन रा. परब(बाबूजी), सिंधुदुर्ग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here