मुंबई- श्री हरिहरेश्वर सेवा मंडळ तळवडे, मुंबई यांचा कौटुंबिक सोहळा दादर, मुंबई येथे संपन्न झाला. रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी हा सोहळा संपन्न झाला. त्या सोहळ्यात श्री नितीन म्हापसेकर कक्ष अधिकारी राजशिष्टाचार विभाग यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सुदंर असे सूत्र संचालन सोबतच नाना पाटेकर यांच्या वेशात “आ गये मेरे मौत का तमाश्या देखणे” हा अभिनय देखील सादर केला.
सदरच्या कार्यक्रमाला अक्कलकोट भुषण श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर -संस्थापक, सचिव,श्री स्वामी समर्थ मठ,हडपीड, देवगड तसेच ज्येष्ठ अभिनेते श्रीमान अनिल बापू गवस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याबदल त्यांचा श्री हरिहरेश्वर मंडळाच्या वतीने सत्कार, सन्मान झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन झाले.

