Sindhudurg: संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठ आयोजित ‘अविष्कार’ स्पर्धेत भरघोस यश

0
91
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन
समूह नृत्य ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

कुडाळ- कुडाळ शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये मुंबई विद्यापीठाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘अविष्कार’ स्पर्धे मध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एकूण ६ रिसर्च प्रोजेक्ट ची प्राथमिक फेरीत निवड झाली. सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्पर्धेची प्राथमिक फेरी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे घेण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/covid19-जिल्ह्यांमध्ये-आरोग्य/

दरवर्षी मुंबई विद्यापीठ अविष्कार हि स्पर्धा महाविद्यालय स्तरांवर आयोजित करते. महाविद्यालायीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबाबत आवड व कौशल्य विकसित व्हावं आणि त्यांच्या संशोधनाला समाजात वाव मिळावा ही या स्पर्ध्येमागे संकल्पना आहे.

संत राऊळ महाराज महाविद्यालयातून एकूण ९ प्रोजेक्ट्स स्पर्धेसाठी सहभागी होते त्यामधून ६ रिसर्च प्रोजेक्ट्सना मुंबई विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या अंतीम फेरी साठी निवडण्यात आलेले आहे. सानिका फाले, वैभवी सातर्डेकर, प्रथमेश दळवी, शुभम गोलम, राहुल प्रभुदेसाई, कानकेकर क्षितीज, साईराज मोरजकर, फर्नांडीस आरोन, मानसी सावंत, वालावलकर मृण्मयी, अथर्व तेंडोलकर, कौशल यमकानमार्डे, तेजस सावंत आणि मयुरी चव्हाण या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठात होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाविद्यालयातून सदर स्पर्धेसाठी प्रा. डॉ. अनंत लोखंडे, प्रा. भावेश चव्हाण, प्रा.सुहास पाटील, प्रा. डॉ. योगेश कोळी, प्रा. प्रज्ञा सावंत, प्रा. खेमराज कुबल, प्रा प्रणव तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क म शि प्र मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे आणि प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले आणि पुढील फेरी साठी शुभेच्छा दिल्या

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here