प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ सी व्ही रामन यांच्या Raman Effect संशोधनासाठी 28 फेब्रुवारी हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या सायन्स असोसिएशन विभागामार्फत आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी एकूण 28 विविध वैज्ञानिक तसेच इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प, 10 रासायनिक मनोरंजक प्रयोग आणि 50 हून अधिक वनौषधींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पती शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले प्रयोग व विविध प्रकल्प प्रदर्शनात मांडले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. टी.आवटे सर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सायन्स असोसिएशन विभागाचे सर्व प्राध्यापक सभासद, महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
महाविद्यालयाच्या सायन्स असोसिएशन विभागामार्फत घेतल्या गेलेल्या ‘ पोस्टर प्रेझेन्टेशन कॉम्पिटिशन’ स्पर्धेचे बक्षीस वितरणही या प्रदर्शना दरम्यान करण्यात आले. तसेच 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या ALL CHEM कार्यक्रमातील विविध स्पर्धामध्ये विजेत्यांना यावेळी बक्षिसे वितरित करण्यात आली. प्रभारी प्राचार्य डॉ व्ही. बी. झोडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी काही स्वतः रोख रक्कमेची बक्षिसे जाहीर करून वितरित केली. आपल्या मनोगतात बोलताना डॉ. आर. वाय. ठाकूर आणि डॉ. एस के पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्नेहल गावडे आणि सिद्धांत यांनी केले. कु. सिद्धांत याने सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला. सायन्स असोसिएशन विभागातील सर्व प्राध्यापक सदस्य आणि विद्यार्थी यांनी या कार्यक्रमा साठी खूप मोलाचे योगदान दिले.