Sindhudurg: सततच्या बदलत्या वातावरणाचा मच्छिमारांना फटका

2
226
मासेमारी
पावसाळी हंगामामुळे खोल समुद्रातील मासेमारी १ जूनपासून बंद

सिंधुदुर्गप्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

गेल्या काही दिवसात वातावरणात सतत बदल होत असून त्याचा परिणाम म्हणून मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे.त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. मासेमारी हा कोकणातील प्रमुख व्यवसाय असून,सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो कुटुंबं मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी पावसाळ्यानंतर मासेमारी सुरू झाल्यापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलाचा मोठा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

ऑगस्ट महिन्यापासून पारंपरिक मासेमारी पाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरू आहे. मात्र, मासे मिळेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय खलाशांचाही प्रश्न अजूनही सतावत आहे. मासेमारी सुरू झाल्यानंतर एकापाठोपाठ वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने बहुतांश वेळा मासेमारी नौका किनाऱ्यावरच नांगरून ठेवण्यात येतात. तसेच खोल समुद्रात जाऊनही मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांच्या निर्यातीवरही झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास मच्छीमारांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण होणार आहे.

2 COMMENTS

  1. […] त्यामुळेच, कोरोना कालावधीत लाईट बिलावरुन मोठी समस्या निर्माण झाली होती. कोरोना कालवधी अनेकांच्या घरातील लाईटचं बील वाढीव आल्याने महावितरणविरोधात अनेकांनी मोर्चे काढले होते. तर, काहींनी महावितरणच्या कार्यालयांना टाळेही ठोकले होते. त्यामुळेच, वीजेची बचत हाच बिल कमी येण्याचा पर्यायी मार्ग आहे. त्याला अनुसरुनच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘‘स्टार जितके जास्त तितकी त्या विद्युत उत्पादनाची “ऊर्जा बचत क्षमता” जास्त असते. म्हणूनच केव्हाही 5 स्टार रेटिंग असलेलेच विद्युत उत्पादन खरेदी करा”, असे आवाहन एमएसईबीने केले आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सततच्या-बदलत्या-वाताव… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here