Sindhudurg: सतत विदयुत प्रवाह कमी जास्त होवून नुकसान होत असलेबाबत वैभववाडी व्यापारी संघटनेचे उपविभागीय अभियंता महावितरण वैभववाडी यांना निवेदन

0
45
वैभववाडी व्यापारी संघटनेचे उपविभागीय अभियंता महा वितरण वैभववाडी यांना निवेदन

31 डीसेंबर 2022 पर्यंत समस्या मार्गी न लावल्यास 1 जानेवारी 2023 पासून असहकार आंदोलनाचा व्यापारी मंडळाचा इशारा; व्यापारी मंडळाने दिलेल्या निवेदनातून महावितरण विभागाप्रती असलेला रोष केला व्यक्त

वैभववाडी (मंदार चोरगे)

वैभववाडी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सततच्या विदयुत प्रवाह कमी जास्त होण्यामुळे व्यापारी बांधवाच्या दुकानातील किंमती इलेक्ट्रॉनिकस उपकरणातील सततच्या बिघाडामुळे वैभववाडी बाजारपेठेतील व्यापारी वर्गाचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. त्याप्रकरणी मागील आमसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थीत केलेला होता यावर सविस्तर चर्चा होवून आम.नितेश राणे यांनी यावर तातडीने उपाय योजना करुन प्रश्न निकाली काढणेचे आदेश महावितरण विभागाला दिलेले होते. त्यावर विदयुत विभागाकडून सदर प्रश्न ताबडतोब मार्गी लागेल असे आश्वासन आमदार नितेश राणे व व्यापारी वर्गाला देण्यात आलेले होते. पंरतू एक वर्षाचा कालावधी लोटला तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून विदयुत प्रवाहाबाबतचा प्रश्न अद्यापही मार्गी लागू शकलेला नाही. त्याबाबत वैभववाडी तालुका व्यापारी मंडळ यांनी आज वैभववाडी महावितरण विभागाचे अभियंता यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सततच्या-बदलत्या

सदर निवेदनात 21 वे शतक हे संगणक युग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे उदयोग व्यवसाय हे ऑफलाईन पध्दतीने न चालता प्रत्येक व्यवहार ऑनलाईन पध्दतीने चालविले जातात हे आपल्या विभागाला ज्ञात आहे. आजकाल शाळा,महाविदयालये,बँका, किरणा स्टोअर,मेडीकल स्टोअर्स,महा ई सेवा केंद्र,शासकीय कार्यालय व शासकीय कार्यालयातील सेतूसुविधा केंद्र,आधारकेंद्र यामध्ये सर्व व्यवहार ऑनलाईन पध्दतीने चालतात आणि त्यासाठी संगणक,लॅपटॉप,प्रिन्टर,बॅटरी बॅकअप युपीएस या सारखी हजारो रुपयाची किमंती उपकरणे आवश्यक असतात तरी वैभववाडी बाजारपेठेतील विदयुत प्रवाहातील कमी जास्त प्रमाण तसेच विज प्रवाह सततचा खंडीत होणे यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे नुकसान होवून व्यापा-यांचेआर्थिक नुकसान यापूर्वीही झालेले आहे तसेच आताही होत आहे. या नुकसानामुळे तसेच सेवेत खंड पडल्यामुळे आम्हां व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या रोशाला सामोरे जावे लागते. तरी या सततच्या होणा-या विदयुत प्रवाहाच्या समस्येमुळे आम्ही सर्व व्यापारी वर्ग तसेच बाजारपेठेत आमच्या विश्वासावर येणारे सामान्य ग्राहक, शेतकरी वर्ग यांना विदयुत विभागाच्या चुकीमुळे त्रास सहन करावा लागतो आहे असे म्हंटले आहे. ग्राहक हा राजा आहे आणि ग्राहकाला सार्वभौमत्व असते असे म्हटले जाते पंरतू अश्या ग्राहकांच्या समस्यांकडे विदयुत विभागाकडून कसलीही गंभीर दखल घेतली जात नाही. पावसाळयात होणारी अतिवृष्टी,महापूर,विजांचा कडकडाट या सारख्या आपत्ती आम्ही व्यापारी समजू शकतो पंरतू वैभववाडी बाजारपेठेतील समस्या ही केवळ पावसाळयापूरती मार्यादीत नसून बारमाही महिने याचा त्रास गेल्या कित्येक वर्षापासून विज ग्राहकांना होत आहे. कोरोना सारख्या विषाणुमुळे आर्थिकदृष्टया ग्रासलेला व्यापारी वर्ग आपल्या व्यवसायात स्थीरस्थावर होणेसाठी धडपडत असताना काही कारणास्तव काही व्यापा-यांकडून विजेची बिले थकित राहीली तेव्हा आपल्या कार्यालयामार्फत विजवसूलीची कडक अंमलबजावणी करीत लाईट मिटर कट करुन वसूली करण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकाराला घाबरुन व्यापा-यांनी इकडून तिकडून ऐनवेळी उसणे पैसे घेवून आपली वाढीव बिले, सरासरी बिले या बददल तुम्हाला कोणतीही विचारणा न करता थकीत बिले भरली आहेत असे असातना बिले मागण्यासाठी दहा वेळा उंबरे झिजवणारा आपला कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आमच्या विज समस्या बददल आपल्याकडे तक्रार केली असता कोणतीही समाधानकार उत्तरे न देता किंवा जागेवर येऊन परिस्थितीची पाहणी न करता असहकाराची भुमिका ब-याचवेळा दिसून येते. या सर्व प्रकारामुळे आपल्या विभागाबददल आम्हा सर्व व्यापारीवर्ग, शेतकरी वर्ग व सामान्य नागरीकांमध्ये नैराश्य पसरले आहे. या नैराश्यामधून एखादया व्यापा-याने किंवा सामान्य नागरीकाने आपल्या विभागाविरुदध किंवा आपल्या कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या विरुदध वाईट वागणूकीचा अवलंब केला तर त्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल असेही निवेदनात व्यापाऱ्यांनी नमूद केले आहे. सदय परीस्थीतीमध्ये वैभववाडी बाजारपेठेचा होणारा विकास आणि विस्तार तसेच वाढती लोकसंख्या आणी बदलते रहाणीमान यामध्ये इलेक्ट्रानिक्स उपकरणाचा मोठया प्रमाणात वापर केला जातो आणि हा वापर भविष्यात वाढणारा आहे.बाजारपेठेतील अशा वाढत्या विज समस्याबाबत सद्य परिस्थीतीमध्ये आपल्याकडे कोणतेही योग्य नियोजन दिसून येत नाही. तरी ही विज समस्या केवळ व्यापारी वर्गाची नसून,सामान्य नागरीक व शेतकरी वर्ग यांची सुदधा आहे याची आपण गंभीर दखल घ्यावी.

वरील उल्लेखीत विषयाचा आशय लक्षात घेवून दिनांक 31 डीसेंबर 2022 पर्यंत आपल्या विभागाने वैभववाडी बाजारपेठेतील विदयुत पुरवठयाबाबत गंभीर दखल घेवून विजेचे कमी जास्त प्रमाण, विजेचे एका मिनीटासाठी बंद चालू होणे, अशा गंभीर समस्या मार्गी लावाल अशी अपेक्षा करत आणी तसे न झाल्यास आम्ही सर्व वैभववाडी बाजारपेठेतील व तालुक्यातील व्यापारी वर्ग , सामान्य जनता तसेच शेतकरी वर्ग हे लोकशाही मार्गाने आपल्या दालनासमोर आंदोलन करुन दिनांक – 1 जानेवारी 2023 पासून आपल्या विभागासोबत असहकार आंदोलन हाती येईल. याची कल्पना वजा सूचना आपणास या निवेदनाव्दारे देत आहोत या आशयाचे निवेदन वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेचे दिले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-5-स्टार-रेटींगवालीच-

यावेळी व्यापारी मंडळ तालुकाध्यक्ष रत्नाकर कदम तसेच सुरेंद्र नारकर, तेजस आंबेकर, मनोज सावंत, संताजी रावराणे, बाळु शिरावडेकर, सचिन सावंत, प्रशांत कुळये, आशिष रावराणे, संतोष कुडाळकर, बंडु गाड, तेजस साळुंखे आदी पदाधिकारी व व्यापारी , व्यावसायिक उपस्थित होते.

सदर निवेदनाची प्रत माहितीसाठी मुख्यमंत्री,एकनाथजी शिंदे, उर्जामंत्री,देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री,रविंद्रजी चव्हाण,आमदार,नितेश राणे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग., पोलिस अधिक्षक,सिंधुदुर्ग.,मा.म.रा.वि.मं.अधिक्षक अभियंता.,कार्यकारी अभियंता,कुडाळ.,जिल्हाध्यक्ष,ग्राहक पंचायत महाराष्ट्र., तहसिलदार ,वैभववाडी,पोलिस निरीक्षक,पोलिस ठाणे वैभववाडी. यांना देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here