वेंगुर्ला प्रतिनिधी- बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय समुहगीत गायन लहान गट स्पर्धेत श्री वेताळ विद्यामंदिर तुळस शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले कविवर्य सुरेश भट लिखित ‘गे मायभू तूझे मी‘ या गीताने प्रथम क्रमांक मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सरंबळ-इंग्लिश-स्कुल-सरं/
जिल्हा परिषद आयोजित महोत्सव २०२२-२०२३ मध्ये या गीताने केंद्रस्तर, प्रभागस्तर, तालुका स्तरावर अव्वल स्थान प्राप्त करून जिल्हास्तरावर सहभाग घेतला होता. श्री वेताळ विद्यामंदिर तुळस शाळेतील विद्यार्थ्यांनी या आधीही विविध स्तरावर समुहगीत स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. तसेच या शाळेत पालक व समाज सहभागातून राबविलेल्या विविध शैक्षिणक उपक्रमांमुळे शाळेची उपक्रमशील शाळा म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, शोभराज शेर्लेकर, माजी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, माजी गटशिक्षणाधिकारी एम.पी.मेस्त्री, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, म.ल.देसाई, के.टी.चव्हाण केंद्रप्रमुख लवू चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव राऊळ यांनी तसेच जिल्हातील शिक्षक व कला प्रेमी नागरिक यांनी मुलांचे तसेच शिक्षक शितल गावडे व एकनाथ जानकर यांचे अभिनंदन केले आहे.
फोटोओळी – समुहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त वेताळ विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.