Sindhudurg: सर्पमित्र महेश राऊळ ‘द रियल हिरो‘ पुरस्काराने सन्मानीत

3
453
सर्पमित्र महेश राऊळ ‘द रियल हिरो‘ पुरस्काराने सन्मानीत

वेंगुर्ला प्रतिनिधी- विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी जिल्हा-हिगोली यांच्यातर्फे यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्पमित्र म्हणून काम करणारे पुरुष व महिला यांची निवड करून त्यांना द रियल हिरो व शूर तेजस्विनीत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी तुळस गावचे सुपुत्र, सर्पमित्र तथा प्राणी मित्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुरक्तमित्र रक्तदाता संघटनेचे उपाध्यक्ष महेश राऊळ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘द रियल हिरो‘ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ सर्पमित्रांचा समावेश होता.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-महिला-हवालदारावर-प्राण/

महेश राऊळ यांनी सर्पमित्र म्हणून कार्यरत असतानाच अनेक जखमी प्राण्यांवरदेखील उपचार केले आहेत. तर जिल्ह्यामध्ये कुठेही रक्ताची गरज असेल तर त्या ठिकाणी अगदी तासाभराच्या कालावधीत गरजूंना रक्त पुरवण्याचे कार्यही राऊळ करत आहेत. पुरस्कार प्रदान प्रसंगी सर्प अभ्यासक निलीम कुमार खैरे, डॉ.संजय नाकाडे, देवदत्त शेळके, डॉ.श्रीधर कंदी, गणेश भाऊ मेहंदळे, डॉ. म्हस्के, आमदार संजय बांगर, सर्प अभ्यासक डॉ.कुणाल साळुंखे तसेच कार्यक्रमाचे आयोजक विजयराज पाटील हे उपस्थित होते. महेश राऊळ यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विलासराव-देशमुख-अभय-योज/

फोटोओळी  – सर्पमित्र महेश राऊळ यांचा द रियल हिरो २०२२ पुरस्कार देऊन जागतिक सर्पतज्ज्ञ मिलिंद कुमार खैरे व विजयराज पाटील यांनी सन्मानित केले

3 COMMENTS

  1. […] आता बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोग मान्य करतो. बाळासाहेब ठाकरे हे उध्दव ठाकरे यांचे वडील. उध्दव ठाकरे यांचा त्या नावावर पूर्ण अधिकार असे असताना निवडणूक आयोग निर्णय घेतो हे किती प्लॅनिंगने सुरु आहे आणि भयंकर आहे हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येतेय त्यामुळेच राज्यातील जनतेचा भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारवरील राग पदोपदी वाढतोय असेही जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेने ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम-दाम-दंड भेद वापरायचा व त्याला पळवायचे हे योग्य आहे का? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी यावेळी केला.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सर्पमित्र-महेश-राऊळ-द/ […]

  2. […] गेल्या काही दिवसांपासून पाऊसाचा जोर कमी झाला असतानाच पार्टीच्या पावसाने अचानक जोर धरला आहे .मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून नागरिकांची आणि शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसामुळे बळीराजाचे हाती आलेले पीक वाया गेले आहे. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सर्पमित्र-महेश-राऊळ-द/ […]

  3. […] यामध्ये हृदयविकार ,उच्च रक्तदाब, मधुमेह ,अनेक प्रकारच्या गंभीर तापाचे रुग्ण तपासणार आहेत. शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्या तपासणीची वेळ 11:30 ते 1:30 पर्यंत राहील.सामाजिक बांधिलकी व राजा शिवाजी चौक मित्र मंडळ रुग्णांना सोयी सुविधा मिळण्याकरिता नेहमी पुढाकार घेत असतात .सहा महिन्यापूर्वी सामाजिक बांधिलकीच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालय परिसरातील खराब झालेला रस्ता नवीन करण्यात आला होता. तसेच अमृत महोत्सवाला हॉस्पिटला 75 टेबल्स दिली, त्याचप्रमाणे स्ट्रेचर, व्हील चेअर यांची दुरुस्ती करून दिली होती. आज राजा शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने महिलांना कपडे चेंज करताना किंवा रुग्ण गंभीर असताना कर्टनची कमतरता भासत होती ही गंभीर समस्या व त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन या मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर ,सामाजिक बांधिलकीचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर व रवी जाधव यांनी महिला वार्ड साठी कर्टन उपलब्ध करून दिला.राजा शिवाजी चौक मित्र मंडळ व सामाजिक बांधिलकी अशा प्रकारचे समाज उपयोगी अनेक उपक्रम शहरामध्ये राबवत आहेत. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सर्पमित्र-महेश-राऊळ-द/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here