प्रतिनिधी-पांडुशेठ साठम
देवगड: देवगड समुद्रामध्ये एक संशयास्पद बोट 15.40 वा.10 नॉटिकल मध्ये येत असल्याची माहिती मिळाली. सागर कवच अभियानांतर्गत सागरकन्या पोलीस स्पीड बोटीवर पीएसआय साळुंखे पीएसआय चव्हाण , शकील अहमद, सखो तरवडकर वगैरे समुद्रामध्ये पाहणी करत होते. त्यामुळे गस्त घालणाऱ्या पोलिसांनी सदर बोटीचा पाठलाग केला. थोड्यावेळातच सदर बोट ताब्यात घेतली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-माणगाव-दत्तमंदिर-रस्त्/
देवगड समुद्रामध्ये एक संशयास्पद बोट ताब्यात घेतानाची क्षणचित्रे





त्यावेळी सदर बोटीमध्ये रेड टीमचे दोन पोलीस अंमलदार व तटरक्षक दलाचे एक अंमलदार असे घुसखोरी करण्याच्या प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. त्याशिवाय सदर रेड टीमकडे डमी बॉम्बही सापडला आहे. सदरच्या रेड टीमच्या बोटीचे पीटीडीएस पदकामार्फत कसून तपासणी करण्यात येत आहे. याबाबत ठाणे दैनंदिनी मध्ये नोंद घेण्यात आलेली असून नमूद रेड टीम यांना 18.00 वा. त्यांचे कार्य समाप्त झाल्याने सोडण्यात आले आहे. त्याशिवाय पुढील घुसखोरी रोखण्यासाठी सतर्क पेट्रोलिंग व सागर गस्त नेमण्यात आलेली आहे, पेट्रोलिंग सुरू आहे. अशी माहिती देवगड पोलीस ठाणे यांनी दिली आहे.


