वेंगुर्ले- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनसुरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी उद्या असलेल्या एकादशीच्या पूर्वसंध्येला सागर तीर्थ समुद्रकिनारी सुंदर असे श्री विठ्ठलाचे वाळू शिल्प रेखाटले आहे. ‘राम कृष्ण हरी’ असा जयघोष केला आहे. या वाळू शिल्प कलेतून विराज चिपकार्यांनी विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण केली आहे. किनाऱ्यावरील हे वाळू शिल्प पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत.

