Sindhudurg: सामाजिक सलोखा राखण्यासाठी न्याय दिवस साजरा-प्रा.नंदगिरीकर

0
22
सामाजिक सलोखा राखण्यासाठी न्याय दिवस साजरा-प्रा.नंदगिरीकर

वेंगुर्ला प्रतिनिधी-जागतिक सामाजिक न्याय दिवस ही थीम घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजातील पीडीतांना न्याय देण्यासाठी व न्यायव्यवस्था मजबूत करुन सामाजिक सलोखा राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस साजरा होतो असे प्रतिपादन बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.व्ही.पी. नंदगिरीकर यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-गुरु-रविदासांच्या-संकल्/

 कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे नेहरू युवा केंद्र व महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागातर्फे आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.  जागतिक समानता राखत समाजात अन्याया विरोधी आवाज उठवून गरिबीलिंगभेदधार्मिक भेदभाव संपविण्यासाठी व जनजागृतीसाठी समाजातील नवीन पीढीने नेतृत्व केले पाहिजे असे यावेळी न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुखडॉ.संजीव लिंगवत यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी केळकर यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी डॉ.मनोज आरोसकरडॉ.सतिश पाटीलडॉ. श्रीराम हिर्लेकरनेहरू युवा केंद्राचे तुषार परबदिव्या गावडे उपस्थित होते. सुत्रसंचालन महादेव परब यांनी केले. स्वागत स्नेहा गोसावी यांनी तर आभारप् पियुष हिवाळे यांनी मानले.

फटोओळी – आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवसानिमित्त प्रा.नंदगिरीकर यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here