प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
ओरोस– तीन महिन्याच्या कालावधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी मूळचे सिंधुदुर्ग सुपुत्र असलेल्या व डोंबवली मतदारसंघाचे सदस्य असलेल्या सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचे पालकमंत्री होण्याचा मान मंत्री चव्हाण यांना मिळाला आहे. तसेच राज्यात सत्ता युतीची असल्यावर शिवसेनेचा पालकमंत्री हा इतिहाससुद्धा पुसला गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर या जिल्ह्यावर पालकमंत्री म्हणून सर्वाधिक काळ काँग्रेसचे पालकमंत्री राहिले आहेत. त्या पाठोपाठ शिवसेनेला मान मिळाला.
राज्यात दोनवेळा युतीचे सरकार आले. पहिल्या वेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी सुद्धा जिल्ह्यात आप्पा गोगटे यांच्या रूपाने भाजपचे एक आमदार जिल्ह्यात होते; परंतु त्यांच्याकडे मंत्रीपद नव्हते. त्यावेळी शिवसेनेच्या नारायण राणे यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आले होते. त्यानंतर मागच्या पाच वर्षात युतीचे सरकार होते. यावेळी भाजपचे मुख्यमंत्री होते; पण जिल्ह्यात भाजपचा आमदार नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या केसरकर यांच्याकडे पालकमंत्री पद राहिले होते. त्यानंतर जनतेने शिवसेना भाजप युतीला पुन्हा बहुमत मिळाले होते. जिल्ह्यात नितेश राणे यांच्या रूपाने भाजपला आमदार मिळाला होता; परंतु युतीची सत्ता न येता महाविकास आघाडी सरकार आले. अडीज वर्षांनी शिवसेनेचा शिंदे गट व भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे भाजपला संधी मिळाली


