Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण २०० स्वयंसेवकांना ‘आपदा मित्र’ चे प्रशिक्षण;नाव नोंदणी करण्याचे आवाहन

0
79

राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत “आपदा मित्र” हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण २०० स्वयंसेवकांना आपदा मित्र चे प्रशिक्षण द्यावयाचे आहे. त्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग याच्यामार्फत प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी करण्यासाठी एक लिंक तयार करण्यात आलेली असून सदर लिंकवर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आविशकुमार सोनोने यांनी केले आहे.

  • आपदा मित्र” साठी आवश्यक निकष
  • -“आपदा मित्र” साठी आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनी आपली नाव नोंदणी करावी. -आपदा मित्र प्रशिक्षणात सहभागी होणारी व्यक्ती वय वर्षे १८ ते ४० दरम्यान असावी. -माजी सैनिक, निवृत्त वैद्यकीय व्यवसायिक, स्थापत्य अभियंता यांच्यासाठी वयोमर्यादा शिथिल केली जाईल. -सदर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणारी व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची रहिवासी असावी. – -सदरची व्यक्ती किमान ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक. शारीरिक,मानसिक व भावनिक दृष्ट्या सदर व्यक्ती सुदृढ असावी (वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे आहे.
  • -आपत्ती प्रतिसादाचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य.
  • -प्रत्येक सहभागी व्यक्तीकडे स्वतः चे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • -प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी पुढील लिंक वर नाव नोंदणी करण्यात यावी. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd2238qMHgIIvFua7TjCKkVizyYIJ1Dszp17phF4ErepMds6g/viewform
  • -आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणा-या व्यक्तीस शासनाकडून आपत्ती प्रतिसादासाठी आवश्यक साहित्याचा संच आपदा मित्र गणवेश देण्यात येईल. तसेच सदर व्यक्तीचा शासनामार्फत विमा उतरविणेत येईल, तरी सदर लिंक वर अधिकाधिक युवक/युवती यांनी नाव नोंदणी करून आपत्ती प्रतिसादाच्या या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here