सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार मार्फत मॉडेल करिअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे. सद्यास्थितीत मॉडेल करिअर सेंटर मध्ये उमेदवरांची नोंदणी, करिअर मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन सत्र मोफत आयोजित करण्यात आले आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्राचे-पाच-तुकड/
करिअर मार्गदर्शन आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, तळमजला, प्रशासकीय संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त इ.सि. शेख यांनी केले आहे.