Sindhudurg: ‘सी वर्ल्डचं’ घोडं गंगेत न्हाऊ दे..’ गेली १० वर्षे रेंगाळलेला आणि आशिया खंडातील एकमेव प्रकल्प

0
30

प्रतिनिधी : अभिमन्यू वेंगुर्लेकर

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गचे अर्थकारण बदलणारा मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील सी वर्ल्ड प्रकल्प होण्यासाठीच्या हालचालींनी आता वेग घ्यायला काहीच हरकत नाही.
ज्यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात केली ते भाजपाचे नेते नारायण राणे हे आता केंद्रात मंत्री आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे गेली १० वर्षे रेंगाळलेला आणि आशिया खंडातील एकमेव प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या सी वर्ल्ड प्रकल्पासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीरदेखील केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-प्रोटोलॉजी-लेझर-मशीन-मं/
सी वर्ल्ड प्रकल्प झाला तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटक जे गोव्यात येतात, राहतात. खर्च करतात ते सिंधुदुर्गात येऊन राहतील, खर्च करतील आणि जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात भर घालण्यासाठी मदत होईल. सी वर्ल्ड हा आशिया खंडातील एकमेव प्रकल्प असून, तो पूर्ण झाल्यास आपल्याकडे विकासाची गंगा कायमस्वरूपी वास्तव्य करील. एवढी ताकद या प्रकल्पात आहे. २०१२ साली तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून काँग्रेस आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतूददेखील केली होती. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केल्याने तो प्रकल्प तेव्हापासून रखडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here