वेंगुर्ला प्रतिनिधी-मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या औचित्याने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस यांच्यावतीने श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे शालेय मुलांच्या हस्ताक्षर सुधारणेसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. नेमळे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक व भाषातज्ञ विकास गोवेकर यांनी हस्ताक्षर सुधारणाबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. मात्रा, वळण, वेग, अंतर, वेलांटी आदींवर चर्चात्मक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना हस्ताक्षर कसे असावे आणि त्यासाठी तंत्र काय असावे याविषयी मार्गदर्शन केले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-जावा-येझ्दी-मोटरसायकलत/
हस्ताक्षर कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमत पार्वतादेवी वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विकास गोवेकर, वाचनालय खजिनदार प्रकाश परब, प्रा.सचिन परुळकर, सुजाता पडवळ, संजय पाटील सर, ढोले-पाटील सर, सानाप सर, सुतार सर आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या अनुषंगाने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात सुरुचि मराठे (प्रथम), सोनल मराठे (द्वितीय), पुष्कर पेडणेकर (तृतीय), हर्षदा होडावडेकर व अनुष्क अडके (उत्तेजनार्थ) यांनी यश मिळविले. यांना वाचनालय तुळसकडून मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
फोटोओळी – हस्ताक्षर कार्यशाळेचे उद्घाटन सगुण माळकर यांनी केले.
[…] मालवण -आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या विशेष निधीतून किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिरात दगडात कोरलेले भव्य सिंहासन साकारण्यात येत आहे. सिंहासनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आ. वैभव नाईक यांनी शुक्रवारी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. मंदिराचे जे काम प्रस्तावित आहे ते कामही ऐतिहासिक ठेवा जपत तातडीने सुरु होणार असून किल्ल्यावर पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधा उभारण्याचा मानस आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुंदर-हस्ताक्षर-स्पर्… […]