Sindhudurg: सुरपस्टार अभिनेते अमिताब बच्चन यांनी चाखला कोकणचा मेवा

5
380

वेंगुर्ल्यातील नर्मदा कॅश्यूच्या काजू लाडवांची भेट

वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरपस्टार अभिनेते अमिताब बच्चन यांना कोकणचा मेवा म्हणून वेंगुर्ला येथील प्रसिद्ध नर्मदा कॅश्यूचे इंडस्ट्रीजचे स्वादिष्ट लाडू भेट देण्यात आले. सौ.सुचित्रा मंदार तोरणे हिने दिलेल्या काजू लाडवांचा आस्वाद घेत अमिताब बच्चन यांनी या उत्कृष्ट उत्पादनाबद्दल गौरवोद्गार काढले. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-पॅडीला-झालीय-लगी

टेलिव्हीजनवरील सोनी या वाहिनीवर सुरु असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती‘ या व्यासपिठावर दिपावली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या सांगतेवेळी वेंगुर्ल्याची सुकन्या सौ.सुचित्रा मंदार तोरणे हिने सुपरस्टार अभिनेते अमिताब बच्चन यांना नर्मदा कॅश्यूचे इंडस्ट्रीजमध्ये उत्पादीत केलेले स्वादिष्ट काजू लाडू भेट स्वरुपात दिले. श्री. बच्चन यांनी या कोकणच्या मेव्याचा स्वाद त्वरित चाखलाही आणि या उत्कृष्ट उत्पादनाबद्दल गौरवोद्गारही काढले.

सौ. सुचित्रा तोरणे या वेंगुर्ला-भटवाडी येथील उद्योजक प्रकाश सामंत यांच्या कन्या तर नर्मदा कॅश्यूचे इंडस्ट्रीजच्या संचालिका सौ.मंदाकिनी दिलीप सामंत यांच्या पुतणी होय.

फोटोओळी – सुरपस्टार अभिनेते अमिताब बच्चन यांना कोकणचा मेवा म्हणून सौ.सुचित्रा तोरणे हिने नर्मदा कॅश्यूचे इंडस्ट्रीजचे स्वादिष्ट लाडू भेट दिले.

5 COMMENTS

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरातील ज्येष्ठ वारकरी तसेच श्री रामेश्वर भजन मंडळाचे बुवा विजय गुरव यांना कार्तिक एकादशीनिमित्त भुजनागवाडी भजन मंडळातर्फे विविध अभंगांचा समावेश असलेल्या ‘सकलसंत गाथा‘ या पुस्तकेची प्रत भेट देऊन सन्मान करण्यात आाला.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुरपस्टार-अभिनेते-अमि… […]

  2. […] बीपीसीएलमध्‍ये २४ वर्षांपेक्षा अधिक काळ विशिष्‍ट करिअरसहविविध फायनान्‍स भूमिकांमध्‍येश्री. व्ही. आर. के. गुप्ता कंपनीत संचालक (फायनान्‍स) आहेत आणि संचालक (एचआर)चा अतिरिक्त कार्यभार सांभाळतात.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुरपस्टार-अभिनेते-अमि… […]

  3. […]  यावेळी सरपंच दादा ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, मारुती वाघे, कांडरकर व गावडे आदी उपस्थितीत होते. सरपंच ठाकुर यांनी गावातील विविध विकास कामाबाबत आमदार दीपक केसरकर यांना निवेदन देण्याकरीता माजरेकर यांच्याकडे सुपूर्द केले.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुरपस्टार-अभिनेते-अमि… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here