जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करण्याच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना
प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करून सरंबळ सोनवडेपार वराड रस्त्यावर वराड येथे मोठे पूल मंजूर करून घेतले आहे. मात्र सी.आर. झेड. च्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रेंगाळले होते.त्यासाठी देखील खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून काम सुरु करून घेतले. आज या पुलाच्या कामाची पाहणी खा.विनायक राऊत, आ वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांसोबत केली.ठेकेदार व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.रस्त्याच्या कामांमुळे माडाच्या झाडांचे नुकसान होणार आहे. त्यासंदर्भात देखील नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-ब्राझिल-येथील-बावसकर-दा/
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे सहाय्यक अभियंता श्री. माळगावकर,किशोर भगत, आपा आळवे, हरिश्चन्द्र पवार, अनिल परब, सोमा परब, वराड सरपंच शलाका रावले, किशोरी भगत, शिवाजी चव्हाण, गोपाळ परब, राजू घाडी, आपा परुळेकर, अशोक परब, अमित आंबेकर, बाळा गावडे, कमलाकर परब, विनोद आळवे,बाबू टेंबुलकर आदींसह वराड येथील शिवसैनिक उपस्थित होते.
[…] खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेडवाडी ते मांजरेकरवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे पूल मंजूर केले आहे. यासाठी २ कोटी ६५ लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र ठेकेदाराने हे काम रखडवले असल्याने आज या पुलाच्या कामाची पाहणी खा.विनायक राऊत, आ वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांसोबत केली. अधिकारी व ठेकेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त करत २० मे पर्यंत पुलाच्या स्लॅबचे काम ठेकेदाराने पूर्ण न केल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सक्त सूचना खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता के. के. प्रभू यांना दिल्या.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सोनवडेपार-वराड-पुलाच्… […]
[…] राजापूर :राजापूर तालुक्यातील बारसू- सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरीसाठी सर्वेक्षणाला आजपासून अंशतः सुरुवात झाली. या सर्व्हेक्षणाला ग‘ामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. ग‘ामस्थांचा विरोध आणि ग‘ामसभेचे रिफायनरी विरोध असूनही प्रचंड दडपशाही आणि पोलीस बळाचा वापर करून सर्व्हेक्षण करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची अटक करून, संघटनेमधील इतर कार्यकर्त्यांना तडीपारीच्या, जिल्हाबंदीच्या नोटीसा बजावून ग‘ामस्थांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रकार होत आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सोनवडेपार-वराड-पुलाच्… […]