Sindhudurg: स्तोत्र पाठांतर स्पर्धेत प्रसन्ना बर्वे व साईराज सामंत प्रथम

1
185
स्तोत्र पाठांतर स्पर्धेत प्रसन्ना बर्वे व साईराज सामंत प्रथम
मारुती स्तोत्र व रामरक्षा पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांना तसेच सहभागींना गौरविण्यात आले.

वेंगुर्ला प्रतिनिधी – विश्व हिदू परिषदेच्या वेंगुर्ला प्रखंडाच्यावतीने भाऊ मंत्री यांच्या राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेतलेल्या मारुती स्तोत्र  पाठांतर स्पर्धेत प्रसन्ना बर्वे तर व रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेत साईराज सामंत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तालुकास्तरीय घेतलेल्या या स्पर्धेत सुमारे ४५ शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मारुती-स्टॉप-येथे-२-एप्र/

 इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मारुती स्तोत्र ठेवण्यात आले होते. यामध्ये प्रथम-प्रसन्ना नारायण बर्वेद्वितीय-कृपा निलेश बांदवलकरतृतीय-शर्व बाबुराव आपटेतर अंकुर वामन गावडे व प्रणव गजानन केसरकर  यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले. याचे परिक्षण निवृत्त शिक्षक अजित राऊळ व रत्नप्रभा प्रभूसाळगांवकर यांनी केले.

इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी रामरक्षा स्तोत्र पठण ठेवण्यात आले होते. यात प्रथम-साईराज विनय सामंतद्वितीय-पृथा राघवेंद्र जोशी यांनी क्रमांक पटकाविले. याचे परिक्षण अॅड.सुषमा प्रभूखानोलकर व अजित राऊळ यांनी केले. दरम्यानप्रसन्ना नारायण बर्वे याने श्रीराम रक्षा स्तोत्राचे सफाईदारपणे सादरीकरण करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

 विजेत्यांना रोख बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रक देऊन तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रकपेन व स्केचपेन देऊन गौरविण्यात आलो. बक्षिस वितरण प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाईतालुकाध्यक्ष सुहास गवंडळकरवेंगुर्ला प्रखंडचे अध्यक्ष अरुण गोगटेमंत्री आपा धोंडश्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव रविद्र परबराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबुराव खवणेकर व मंदार बागलकर उपस्थित होते. ही स्पर्धा हायटेक कॉम्प्युटरचे संचालक गणेश अंधारी यांनी प्रायोजित केली होती.

 या कार्यक्रमानंतर विश्व हिदू परिषदेच्या ४८ साधकांनी सामुदायिकरित्या श्री रामरक्षा स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र सादर केले. या कार्यक्रमांसाठी मंदिर उपलब्ध करुन देणारे भाऊ मंत्री यांचे विश्व हिदू परिषदेच्या वेंगुर्ला प्रखंडच्यावतीने आभार मानण्यात आले.

फोटोओळी – मारुती स्तोत्र व रामरक्षा पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांना तसेच सहभागींना गौरविण्यात आले.

1 COMMENT

  1. […] ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात रामसीतेची आकर्षक पूजा बांधण्यात आली. ११ वाजता ह.भ.प.अरुणबुवा सावंत यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर रामजन्म होऊन श्रीरामाची पालखीतून भजनासहीत प्रदक्षिणा काढण्यात आली. दुपारी १ वाजता आरती होऊन उपस्थितांना प्रसाद वाटण्यात आला. मारुती स्टॉप येथील हनुमान मंदिरात ह.भ.प.अवधुत बुवा नाईक यांचे राजन्माचे कीर्तन होऊन रामजन्म करण्यात आला. सायंकाळी भजन आणि आरतीने उत्सवाची सांगता झाली.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-स्तोत्र-पाठांतर-स्पर्… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here