वेंगुर्ला प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने आज वेंगुर्ला शिवसेना कार्यालयात नियोजन बैठकित सावंतवाडी येथे होणाऱ्या गोऱव यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर याच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा भाजप व शिवसेना याच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-case-ih-ने-ऊसाच्या-शाश्वत-शेती/
या नियोजनार्थ वेंगुर्ला शिवसेना कार्यालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या नियोजन बेठक तालुका प्रमुख नितीन माजरेकर याच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सावंतवाडी येथे ३ एप्रिल रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात वेंगुर्ला तालुक्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी जनतेला सहभागी होता यावे यासाठी नियोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक सुनील डुबळे, मच्छिमार सेल अध्यक्ष गणपत केळुसकर, प्रकाश मोटे, व समाधान बादवलकर आदी उपस्थित होते.