वेंगुर्ला प्रतिनिधी- हनुमान जन्मोत्सवानिमित्त व्यायाम प्रसार अभियान अंतर्गत श्री सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ला विद्यार्थी मित्रमंडळाच्यावतीने हनुमान चरणी अभिनव दहा हजार जोर व बैठक संकल्प उत्साहात पूर्ण केला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्हास्तरीय-निबंध-स्प/
गाडीअड्डा येथील डोंगरावरील मारुती मंदिरात घेतलेल्या या कार्यक्रमावेळी किशोर सोन्सुरकर, पिट्या कुडपकर, प्रसाद कोरगांवकर, सुहास मांजरेकर, शंकर मांजरेकर, निनाद दिपनाईक, मनोहर कावले, डॉ.संजिव लिगवत, डॉ.राजेश्वर उबाळे, रीमा करंगुटकर, डॉ.सई लिगवत, मैथिली सोन्सुरकर, संतोष किर, अर्जुन मिशाळे, शिवदत्त सावंत, वसंत तांडेल, दादा पेडणेकर आदी उपस्थित होते. गाडीअड्डा ते मारुती स्टॉपपर्यंत ‘बजरंग बली की जय, जय हनुमान‘ च्या जयघोषांत फेरी काढण्यात आली.
फोटोओळी – डोंगरावरील मारुती मंदिरात श्रीसातेरी व्यायाम शाळेच्या विद्यार्थी मित्रमंडळाने हनुमान चरणी अभिनव दहा हजार जोर व बैठक मारल्या.