ओरोस: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन 2022-23 मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग नगरी येथे करण्याचे निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेचा कालावधी दि.8 ते 9 डिसेंबर 2022 असा होता.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-जिल्ह्यातील-३२५-ग्रामप-2/
तथापि विभागीय व राज्यस्तर स्पर्धांच्या व्यस्ततेमूळे स्पर्धेचे ठिकाण व स्पर्धा कार्यक्रमात बदल करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.ही स्पर्धा दि. 8 डिसेंबर 2022 (सर्व गट मुली व 14 वर्ष मुले) दि.9 डिसेंबर 2022 रोजी 17 व 19 वर्षे मुले) जय गणेश इंग्लिश मेडीयम स्कुल, मालवण येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.


