Sindhudurg News: जिल्हा उत्कृष्ट मंडळ पुरस्कारासाठी ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या मंडळांना अर्ज करण्याचे आवाहन

0
38
जिल्हा उत्कृष्ट मंडळ पुरस्कारासाठी ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या मंडळांना अर्ज करण्याचे आवाहन

ओरोस :जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या युवा मंडळाला भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत नेहरू युवा केंद्राच्यावतीने जिल्हा उत्कृष्ट मंडळ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या मंडळांनी 17 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करावेत असे आवाहन क्रीडा मंत्रालयांमार्फत करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-शेतीच्या-वीज-पुरवठ्या/

पुरस्कारासाठी पात्रता निकष: https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-सुरंगपाणी-येथे-बुधवारी/

  • *ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या युवा मंडळ यांनी व्यवसायिक प्रशिक्षण शिबीर, साक्षरता अभियान, सामाजिक चळवळ, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम, कुटुंब कल्याण, गरिबी निवारण कार्यक्रम, पर्यावरण, पिण्याचे पाणी, श्रमदान, ग्रामीण विकास योजना याद्वारे ग्रामीण विकास प्रक्रियेत आपले योगदान दिलेले असणे आवश्यक आहे .
  • *त्याशिवाय मंडळाने सादर कार्य हे एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीतील असावे.
  • *मंडळ नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गाशी संलग्न असावे.
  • *सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट, 1860 किंवा राज्याच्या समकक्ष कायद्यानुसार नुसार नोदणी केलेले असावे.
  • *2021-22 या वर्षाचा ऑडीट रिपोर्ट आवश्यक आहे.

पुरस्काराचे स्वरूप :

  • जिल्हा उत्कृष्ट मंडळ पुरस्कारामध्ये जिल्हा पुरस्कार रोख रुपये 25 हजार आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या मंडळांची शिफारस राज्यस्तरावर करण्यात येईल. राज्य पुरस्काराचे स्वरूप रुपये 75 हजार, 50 हजार, व 25 हजार आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार रुपये तीन लाख, एक लाख व 50 हजार असे आहे.
  • अधिक माहितीसाठी 02362-295012 या नंबर वर संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here