संगमेश्वर: मुंबई गोवा महामार्गावरील धामणी रेल्वे स्थानकासमोर वॅगनार कारला अपघात झाला. या अपघातात राजापुरातील तिघेजण जखमी झालेआहे. हा अपघात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला.पुन्हा एकदा महामार्गावरील खड्डे आणि मोऱ्यांसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. मोरीसाठी खोदलेल्या खड्ड्यावर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे गाडी खड्ड्यात जाऊन पडल्याचे समजते यामध्ये तिघांना दुखापत झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, रजापुरातून मुंबईला जाणाऱ्या वॅगनार कारला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. मुंबईहून येणाऱ्या गाडीला वाचविण्याच्या नादात कार चालकाने गाडी बाजूला घेतली. यावेळी गाडी मोरीच्या खोदलेल्या(खड्ड्यात) गेल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडी खड्ड्यात पडल्यानंतर तिघेजण जखमी झाले. तिघांमध्ये एका वृध्द महिलेचा समावेश आहे. राजेंद्र पारकर (53, राजापूर), विशाल पारकर (46, राजापूर), अन्य एक महिला (60, नाव माहीत नाही) असे तिघेजण जखमी झाले आहेत.
या अपघाताची खबर कळताच संगमेंश्वर हाॅस्पिस्टल येथील आॅन डुटी १०८ चे वाहन चालक काशिनाथ फेपडे. आणि डाॅ. स्नेहल शेलार यांनी तातडीने घटनास्थळ गाठून अपघातग्रस्थाना बचाव कार्यात सहकार्य करून तातकाळ जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या सेवाभावी कार्यतत्पर सेवेबद्दल प्रशंक्षा नागरिकांतून होत आहे

