वेंगुर्ला प्रतिनिधी- अहमदनगर जिल्हा पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्यावतीने २६ व २७ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे केलेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर, मास्टर पुरुष व महिला राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी सिधुदुर्गचा संघ रवाना झाला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ल्यात-शिवसेना-ठ/
यामध्ये संजय गुरव व अभिजित कांबळे (५७ किलो वजनी गट), कैलास पवार (६० किलो वजनी गट), शौर्य महाडिक (८७ किलो वजनी गट), यश कांबळे (६४ किलो वजनी गट), हंबीरराव देसाई (७८ किलो वजनी गट), ओजस भंडारी (८३ किलो वजनी गट) आदी खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा सिधुदुर्ग पॉवरलिफ्टींग असोसिएशनचे सचिव दिलीप नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले आहेत. वैभव मुद्राळे हे कोच म्हणून काम पहाणार आहेत. अध्यक्ष पुष्काराज कोले, राजू बेग, राजेश घाटवळ, प्रविण नाईक, गणेश मर्गज, विनायक नवार, सिद्धेश नाईक, दिपक राऊळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.


