वेंगुर्ला प्रतिनिधी
वेंगुर्ला मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. त्रैवार्षिक दोन दिवशीय तिसरे मराठी साहित्य संमेलनचा शुभारंभ बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालया कडून करण्यात आला सदर ग्रंथदिंडी वेंगुर्ले बाजारपेठ मार्गे जाऊन साई मंगल कार्यालय येथे विसर्जित झाली
११ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दोन सत्रात हे मराठी संमेलन होणार आहे. या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक कृष्णकांत खोत व कर्नाटकमधील बेळगाव येथील लेखक डॉक्टर विनोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मराठी साहित्य संमेलनात वाड्मयीन अभिरुची वृद्धिंगत होणार आहे
आनंदयात्री कार्यकर्ता सन्मान सोहळयात आनंदयात्रीच्या अगदी सुरूवातीला असलेले आनंदयात्री कार्यकर्ता सन्मान पुरस्कार शरीरसौष्ठवपटू मंगेश गावडे, प्रा राकेश वराडकर , ग्रामसेवक ज्ञानेश करंगुटकर , पत्रकार सुरेश खौलगेकर व पत्रकार सचीन वराडकर याचे सरकार करण्यात येणार आहेत
फोटो ओळी
वेंगुर्ला मराठी साहित्य संमेलन ग्रंथदिंडीचा शुभारंभ पद्मश्री परशुराम गंगावणे याच्या हस्ते झाले यवेळी चित्ररथ


