वेंगुर्ला प्रतिनिधी- सागर किनारपट्टीवरील बंदोबस्ताच्यादृष्टीने वेंगुर्ला येथे सागर सुरक्षा कवच मोहिम मंगळवार सकाळी सहा वाजल्यापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे.
रेडी किनारपट्टी ते हरिचरणगिरी किनारपट्टीपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली आहे. तसेच मानसीश्वर मंदिर समोर मुख्य मार्गावर, रेडी चेक पोस्ट, मठ चेक पोस्ट आदी ठिकाणी नाकाबंदी करुन मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी, सागर सुरक्षा सदस्य, वार्डन, होमगार्ड, कस्टम विभाग, मेरिटाईम बोर्ड विभाग, एनसीसी कॅडेट्स आदींसह पोलिस सहभागी झाले आहेत. ही मोहीम बुधवारी रात्रौ आठ वाजेपर्यंत राबविण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/आर्थिक-दुर्बल-घटकांच्या/
फोटोओळी – सागर सुरक्षा कवच मोहिमेत पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह अन्य सहभागी झाले आहेत.


[…] हिंगोली:- भारत जोडो यात्रा 67 व्या दिवशी हिंगोली शहरांमध्ये दाखल झाली. यावेळी निसर्ग शाळेचे प्रवर्तक अण्णा जगताप यांच्यासोबत ‘ निसर्ग आणि मुले ‘ या विषयावर चर्चा केली. निसर्ग शाळे तर्फे राहुलजी गांधी यांना एक लाख झाडांच्या बिया देण्यात आल्या.भारत जोडो यात्रे दरम्यान हिंगोली पासून काश्मीर पर्यंत चालत असताना ह्या झाडांच्या बिया राहुलजी लहान लहान मुलांना देणार आहेत. ज्यात हादगा, चिंच, स्टोरी, आवळा, जांभूळ, सिताफळ, रामफळ, लाल हादगा, आवरा, कडुलिंब, आवळा इत्यादी झाडांच्या बिया आहेत. निसर्ग विषयक जाणीवा-नेणीवा मुलांच्या अंगी निर्माण व्हाव्यात व माती विषयी निष्ठा निर्माण होण्यासाठी या बिया वाटल्या जाणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-येथे-सागर-… […]