Sindhudurg News: वेंगुर्ल्यात १८ रोजी वीज ग्राहक मेळावा

0
51
वेंगुर्ल्यात १८ रोजी वीज ग्राहक मेळावा

वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा वेंगुर्ला आयोजित व जिल्हा व्यापारी महासंघ, वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ वेंगुर्ला यांच्या सहकार्याने शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे शेतकरी, व्यावसायिक, औद्योगिक व घरगुती ग्राहकांसाठी प्रथमच वीज ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मतदार-यादी-विशेष-पुनरिक/

या मेळाव्यात वीज बिलाबाबत तक्रारी, बंद असलेले पथदीप, वाढीव वीज बिले, कमी दाबाचा विद्युत पुरवठा, महावितरणाच्या विविध योजना अशा विविध तक्रारींचा तत्काळा निकाल लावण्यासाठी घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेतकरी ग्राहकांनी आपल्या मनातील शंका, कुशंका, गैरसमज, तक्रारी, सार्वजनिक हिताची मागणी करण्यासाठी या मेळाव्यात उपस्थित रहावे असे आवाहन ग्राहक पंचायत वेंगुर्ल्याचे अध्यक्ष डॉ. संजिव लिगवत व तालुका व्यापारी अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here