Sindhudurg News: सहाय्यक वायरमन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

1
232

वेंगुर्ला प्रतिनिधी- अणसूरपाल विकास मंडळ, मुंबई आणि जनशिक्षण संस्थान, ओरोस सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने अणसूरपाल हायस्कूल येथे सहाय्यक वायरमन प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ झाला आहे. याचे उद्घाटन ४ डिसेंबर रोजी माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर यांच्या हस्ते झाले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-हेमू-दळवी-सरांना-शिष्य/

 तीन महिने हा प्रशिक्षण वर्ग चालणार असून यात गजानन गावडे व सचिन परब हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचमध्ये २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना भारत सरकारचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भविष्यात अशा प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देणारे वर्ग संस्थेमध्ये कायमस्वरुपी सुरु करणार असल्याचा मानस संस्था सचिव लिलाधर गावडे यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आत्माराम गावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य देऊ गावडे, दत्ताराम गावडे, दिपक गावडे, मुख्याध्यापिका शैलजा वेटे व सचिन परुळकर उपस्थित होते. 

फोटोओळी – अणसूर-पाल येथे सुरु असलेल्या सहाय्यक वायरमन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

1 COMMENT

  1. […] सावंतवाडी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण शाखेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार श्री. रामचंद्र नारायण वालावलकर, केंद्रप्रमुख माडखोल सावंतवाडी (सिंधुदुर्ग) यांना नुकताच जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळ सत्रात १० ते १ या वेळेत जि. प. केंद्रशाळा, माडखोल सभागृह येथे संपन्न होणार आहे http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-सहाय्यक-वायरमन-प्रशिक्/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here