Sindhudurg News: वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिस-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कृष्णांत खोत

0
71
वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिस-या मराठी साहित्य संमेलनाचे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कृष्णांत खोत

वेंगुर्ला प्रतिनिधी- आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे दि. १० व ११ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिस-या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक कृष्णांत खोत तर उद्घाटक बेळगावचे प्रा.डॉ. विनोद गायकवाड हे आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-कणकवली-देवगड-वैभववाडी-त/

लेखक कृष्णांत खोत यांचे ७ कादंब-या, ललित गद्य, कथासंग्रह इत्यादी साहित्य प्रकाशित असून महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘कळे‘ या गावातील उच्च माध्यमिक विभागात ते प्राध्यापक आहेत. तर साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून बेळगाव येथील प्रा. डॉ. विनोद गायकवाड हे उपस्थित राहाणार आहेत. त्यांच्या ५५ कादंब-या, ६ नाटके, १० लेखसंग्रह, ४ कथासंग्रह अशी विपूल ग्रंथसंपदा आहे. कर्नाटकमधील राणी चेनम्मा विद्यापीठातून ते मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेत. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले दोन सुप्रसिध्द साहित्यीक वेंगुर्ला त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असतील. या साहित्य संमेलनात विविध अभ्यासपूर्ण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा रसिकांनी व साहित्य प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे करण्यात आले आहे.

फोटो – कृष्णांत खोतप्रा.डॉ. विनोद गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here